Chilli Market : गावठी मिरची बाजारात दाखल; खरेदीसाठी गर्दी

Chilli Market : दर आवाक्‍यात : ६०० रुपये किलो; ‘भाव’ आणखी उतरण्‍याची शक्‍यता
Chilli Market
Chilli Market Dainik Gomantak

Chilli Market :

डिचोली, या हंगामात पिकलेली गावठी लाल मिरची बाजारात उपलब्ध होऊ लागली आहे. मात्र यंदा या मिरचीचा जळजळाट कमी होण्याचे संकेत मिळत आहेत.

स्थानिक मळ्यांनी पिकलेल्या लाल मिरचीचा सध्याचा दर ६०० ते ६५० रुपये किलो असा आहे. पुढील काही दिवसांत मिरचीची आवक वाढली की हा दर खाली येणार असल्याची शक्यता आहे.

काल बुधवारी डिचोलीच्या आठवडी बाजारात विविध भागातील गावठी मिरची विक्रीस उपलब्ध होती. राज्याबाहेरुन येणाऱ्या गुटूर, बेडगी आदी मिरचीचे दर परवडण्यासारखे असले तरी अधिकाधिक गृहिणी गावठी मिरचीलाच पसंती देतात.

Chilli Market
Goa Politics: 'गोव्यावर संविधान लादलं असं म्हटलंच नाही', विरियातो म्हणतात खोटं बोलणं मोदींचा स्वभाव

गेल्या वर्षी नवीन गावठी लाल मिरची बाजारात आली होती. त्यावेळी सुरवातीलाच लाल मिरची ‘तिखट’ झाली होती. गेल्या वर्षी सुरवातीला ८०० ते ९०० रुपये किलो असा लाल मिरचीचा दर होता. आवक वाढल्यानंतर मात्र मिरची स्वस्त झाली होती. यंदा मात्र सुरूवातीलाच मिरचीचे दर नियंत्रणात आहेत.

आवक वाढणार; दर उतरणार!

रानटी श्वापदांच्या उपद्रवामुळे यंदा काही भागात मिरची पिकाची नासधूस झालेली आहे. हा अपवाद वगळल्यास अनुकूल हवामानामुळे यंदा मिरचीचे पीक समाधानकारक आले आहे. त्यामुळे पुढील आठ-दहा दिवसांत बाजारात गावठी मिरचीची आवक वाढण्याची शक्यता आहे.

डिचोलीच्या बाजारात डिचोली, सत्तरी, बार्देश आणि पेडणे तालुक्यातील काही ठरावीक गावांनी पिकणारी स्थानिक मिरची विक्रीस उपलब्ध होत असते. गावठी मिरची पाठोपाठ ग्राहक पसंती देत असलेली कर्नाटकातील जांबोटी भागातील मिरचीचे मात्र अजून बाजारात दर्शन झालेले नाही. पुढील आठवडी बाजारात जांबोटीची मिरची बाजारात येऊ शकते.

Chilli Market
Goa Accident: गिरीत उड्डाण पुलावरून खाली कोसळला मालवाहू ट्रक; एक कामगार ठार, दोन जखमी Watch

गावठी मिरचीचे सध्याचे दर समाधानकारक आणि सामान्यांना परवडणारे आहेत. बाजारात मिरचीची आवक वाढली की दर आणखी उतरण्‍याचा अंदाज आहे.

गेल्या वर्षी सुरूवातीलाच मिरचीचे दर एक हजार रुपयांपर्यंत गेले होते. नंतर आवक वाढल्याने मे महिन्याच्या अखेरीस हेच दर ३०० रुपयांपर्यंत आले होते. मिरची बाजारात आली की ग्राहकही खरेदीसाठी गर्दी करतात. त्यामुळे सुरूवातीला दर नियंत्रित नसतो.

- दया नाईक, मये

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com