Goa Tourism: पर्यटन व्यवसायावर 'संक्रात'; देश- विदेशी पर्यटकांची संख्या घटली, किनाऱ्यांवर शुकशुकाट

Goa Tourism: कळंगुट, बागा, मोरजी, केरी, हरमल सारख्या समुद्रकिनारी भागातल्या शॅक, हॉटेल्समध्ये मागील 3-4 दिवसांपासून पर्यटकांची तुरळ संख्या दिसून आलीय.
Goa Tourism
Goa Tourism Dainik Gomantak

Goa Tourism: पर्यटनाची राजधानी म्हणून देशासह विदेशातही ओळख असणाऱ्या गोव्यात यंदा एक वेगळेच संकट दिसून आलेय. बारमाही हाऊसफुल असणाऱ्या गोव्याकडे यंदा पर्यटकांनी अक्षरशः पाठ फिरवलीय. विशेष म्हणजे यात विदेशी पर्यटकांची संख्या जास्त आहे.

खरंतर गोव्यात ऑक्टोबर पासून पर्यटन हंगामाला सुरूवात होते. मात्र यंदा नववर्षाच्या सेलिब्रेशन नंतर किनारी भागात काहीसा शुकशुकाट पाहायला मिळतोय.

कळंगुट, बागा, मोरजी, केरी, हरमल सारख्या समुद्रकिनारी भागातल्या शॅक, हॉटेल्समध्ये मागील 3-4 दिवसांपासून पर्यटकांची तुरळ संख्या दिसून आलीय.

Goa Tourism
Sanjivani Sugar Factory Protest: राजधानीत ऊस उत्‍पादकांचा एल्गार; CM च्या बंगल्‍याकडे जाणाऱ्यांना पोलिसांनी रोखले

थंडावल्या या पर्यटन व्यवसायामुळे स्थानिक व्यावसायिक चांगलेच धास्तावले आहेत. स्थानिक हॉटेल्स व्यावसायिक यांच्या सोबतच टॅक्सी, शॅक, रेंट अ बाईक व्यावसायिकांनी व्यवसायासाठी कर्ज काढले असून यंदा पर्यटकांच्या रोडावलेल्या संख्येमुळे त्यांच्या रोजच्या कमाईवर प्रतिकूल परिणाम होत असल्याचे या व्यावसायिकांनी सांगितलेय.

किनारी भागातले खड्डेमय रस्ते, अपुरी पार्किंगची व्यवस्था, किनाऱ्यावर चेंजिंग रुम, पाणी यांसारख्या आवश्यक सुविधांची वानवा यामुळे पर्यटकांच्या संख्येवर परिणाम होत असल्याचे दिसून आले आहेत.

तसेच हॉटेल्स, विमान रेट यांच्या दरात झालेली वाढ ही कारणं पर्यटक गोव्याकडे पाठ ठेवण्यासाठी कारणीभूत असल्याचे स्थानिकांनी सांगितलेय.

वाढत्या चोऱ्या, रेप, खून यांसारखी प्रकरणे सुद्धा पर्यटन व्यवसाय धोक्यात येण्यास कारणीभूत ठरत असल्याचे स्थानिक व्यावसायिकांनी सांगितलेय.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com