Mapusa News: वेर्ला-काणका पंचायतीच्या बैठकीला अधिकाऱ्यांची दांडी; संतप्त सदस्यांनी पंचायतीलाच ठोकले टाळे

Verla Canca Panchayat:- पंचायतीमध्ये CCTV यंत्रणा असून देखील सचिवांनी स्वतःच्या मर्जीने खासगी CCTV बसवल्याने वाद वाढला
Verla Canca Panchayat
Verla Canca PanchayatDainik Gomantak

Verla Canca Panchayat:- जैवविविधता आणि वाहतूक समस्यांशी संबंधित महत्त्वपूर्ण बाबींवर चर्चा करण्यासाठी वेर्ला- काणका पंचायतीने सोमवारी एक विशेष बैठक बोलावली होती. या बैठकीसाठी गट विकास अधिकारी (बीडीओ) आणि सचिव यांना निमंत्रित करण्यात आले असून हे अधिकारी तब्बल दोन तासांहून अधिक काळ अनुपस्थित राहिले.

या प्रकारामुळे समिती सदस्य आणि स्थानिक नाराज झाल्याने त्यांनी अधिकाऱ्यांच्या कृतीचा निषेध म्हणून चक्क पंचायत घराला टाळे ठोकल्याचा प्रकार घडला आहे.

तसेच पंचायतीमध्ये खाजगी सीसीटीव्ही कॅमेरा बसवल्याचा प्रकार देखील घडला असून या बद्दल सरपंचाने नाराजी व्यक्त केली, "हा प्रकार अत्यंत लाजिरवाणा असून आम्ही आमच्या अधिकाऱ्यांकडून अशा कृत्यांची अपेक्षा करत नाहीत.

खाजगीरित्या सीसीटीव्ही कॅमेरा बसवल्याने समितीमधील गोपनीयता आणि विश्वासाबद्दल देखील गंभीर प्रश्न निर्माण झाल्याचे सरपंचांचे म्हणणे आहे.

Verla Canca Panchayat
Goa Police: कळंगुटात पोलिसांचा दलालांना पुन्हा दणका; 11 जणांच्या आवळल्या मुसक्या

दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार सोमवारी सकाळी 11 वाजता वेर्ला- काणका पंचायतीकडून मिटिंग ठरवण्यात आली होती. मात्र मीटिंगला सचिवांसहित गट विकास अधिकारी (बीडीओ) यांनी दांडी मारली.

तसेच पंचायतीमध्ये CCTV यंत्रणा असून देखील सचिव निकिता परब यांनी स्वतःच्या मर्जीने खासगी CCTV बसवला असून त्याची स्क्रीन त्यांनी आपल्या मोबाईला ठेवण्यात आल्याने वाद वाढला. या सर्व प्रकारामुळे संतप्त झालेल्या पंचायतीच्या सदस्यांनी पंचायतीला चक्क टाळे ठोकले.

सचिवांचा पंचायतीच्या कुठल्याच मीटिंगमध्ये सहभाग नसतो. महत्वाच्या मीटिंगमध्ये त्यांची वारंवार गैरहजेरी सल्याचे उपस्थितांकडून सांगण्यात आले.

तसेच त्यांनी बसवलेल्या कॅमेऱ्यांसाठी सरकारी तिजोरीतून पैसे खर्च केले का? याचा तपास करा, त्यांना कॅमेरा बसवण्याचा अधिकार कोणी दिला असा सवाल येथील उपस्थितांनी विचारलाय.

याप्रकरणी सचिवांवर FIR दाखल करण्याची मागणीही स्थानिकांनी केलीय. या सर्व प्रकारामुळे वेर्ला- काणका ग्रामस्थांमध्ये असंतोषाची लाट उसळली असून स्थानिक प्रशासनाच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com