Goa Made liquor Seized: गोवा बनावटीच्या मद्याची महाराष्ट्रात तस्करी, पुण्यात 82 लाखांचे मद्य जप्त

पुण्यातील खेड-शिवापूर येथे ही कारवाई करण्यात आली.
Illegal Liquor Seized
Illegal Liquor SeizedDainik Gomantak

Goa Made liquor Seized: नवीन वर्ष स्वागताच्या पार्श्वभूमीवर गोव्यातून महाराष्ट्रात तस्करी होणारे मद्य राज्य अबकारी खात्याच्या भरारी पथकाने जप्त केले. सुमारे 82 लाख किमतीचे मद्य पथकाने जप्त केले आहे. सोमवारी (दि.18) पुण्यातील खेड-शिवापूर येथे ही कारवाई करण्यात आली.

मिळालेल्या माहितीनुसार, गोव्यातून मद्य वाहतूक करणारा टेम्पो बंगळुरु - मुंबई मार्गे महाराष्ट्रात येणार असल्याची माहिती पथकाला मिळाली. पथकाने पुण्यातील खेडशिवापूर टोलनाक्याजवळ संशयित टेम्पोची तपासणी केली.

तपासणीत पथकाला 45,600 मद्याच्या बाटल्या असलेली 950 बॉक्स आढळून आली. जप्त करण्यात आलेले मद्य बार्देश येथील कंपनीत निर्माण करण्यात आले आहेत.

पथकाने टेम्पोची तपासणी केली तेव्हा चालकाने वाहनात वैद्यकील साहित्य आणि फर्निचर असल्याचे सांगितले, पण पथकाने अधिक तपास केला असता त्यात मद्य आढळून आले.

महाराष्ट्र दारू बंदी कायदा 1949 अन्वये पथकाने चालक विपुल देवीलाल नात यांना अटक करण्यात आली आहे. जप्त केलेली दारू, किंमत 82 लाख रुपये आणि टेम्पो, 11.50 लाख किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com