गोव्यातून मुंबईला तस्करी होणारे 71 लाखांचे मद्य इन्सुली खामदेव नाक्यावर जप्त, बेळगावचा चालक अटकेत

बांदा पोलीस गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ही कारवाई केली.
Goa Made Liquor seized At Sindhudurg Border
Goa Made Liquor seized At Sindhudurg BorderDainik gomantak

Goa Made Liquor seized At Sindhudurg Border: गोव्यातून मुंबईला तस्करी होणारे तब्बल 71 लाखांचे मद्य इन्सुली खामदेव नाक्यावर जप्त करण्यात आले. याप्रकरणी बेळगावच्या रहिवासी चालकाला अटक करण्यात आली आहे. बांदा पोलीस गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ही कारवाई केली.

ज्योतिबा परशुराम गावडे (वय 30, रा. शिवाजीनगर, बेळगाव) असे अटक करण्यात आलेल्या चालकाचे नाव आहे.

गोव्यातून सिंधुदुर्गात वाहतूक होणाऱ्या बेकायदा मद्यावर कारवाई करण्याचे आदेश पोलीस अधीक्षकांनी दिले होते. दरम्यान, बेकायदा मद्य वाहतुकीची माहिती बांदा पोलिसांना मिळाल्यानंतर गुन्हे शाखेने इन्सुली येथे सापळा रचला. यात मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या (KA 22 C 3416) ट्रकची तपासणी करण्यात आली. यात पोलिसांना 71 लाखांचे मद्य आढळून आले.

पोलिसांना चकमा देण्यासाठी ट्रकच्या पाठीमागे वॉल पुट्टीच्या गोण्या भरण्यात आल्या होत्या. त्याच्यामागे गोवा बनावटीचे मद्य लपविण्यात आले होते.

पोलिसांनी या कारवाईत 71 लाख 58 हजार रुपये किमतीचे मद्य आणि 15 लाख किमातीचा ट्रक असा एकूण 86 लाख 58 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. बांदा पोलीस अधिक तपास करीत आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com