दुचाकीवरून गोवा बनावटीच्या दारूची तस्करी, महाराष्ट्रातून छत्तीसगडला जाताना अडकला पोलिसांच्या जाळ्यात

संशयित आरोपी दुचाकीवरून दारूची वाहतूक करत असताना पोलिसांनी त्याला पकडले.
Chhattisgarh
Chhattisgarh

गोव्यातून महाराष्ट्रात आणि तिथून छत्तीसगडमध्ये दारूची अवैध वाहतुकीप्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे. डोंगरगड पोलिसांनी ही कारवाई केली आहे.

त्याच्याकडून 21 हजार किंमतीचे गोवा बनावटीचे मद्य जप्त केले आहे. संशयित आरोपी दुचाकीवरून दारूची वाहतूक करत असताना पोलिसांनी त्याला पकडले.

महाराष्ट्र राज्याच्या हद्दीतून डोंगरगडच्या दिशेने दुचाकीवरून 02 जण अवैध दारूची तस्करी करत असल्याची माहिती डोंगरगड पोलिसांना मिळाली. याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना देण्यात आली, स्टेशन हाऊस ऑफिसर इन्स्पेक्टर राम अवतार ध्रुव यांच्या नेतृत्वाखाली पथक तयार करून नाकाबंदी करून वाहनांची तपासणी करण्याचे निर्देश दिले.

बोरतलाव रोड अरोरा पोल्ट्री फार्मजवळ चेकपोस्ट उभारून वाहनांची तपासणी करण्यात आली. तपासणी सुरू असताना एका व्यक्तीने काही अंतरावर दुचाकी थांबवली, मागे बसलेल्या व्यक्तीला उतरवले आणि तो बोरतलावच्या दिशेने धावत गेला. पोलिसांनी या व्यक्तीला घेराव घालून पकडले.

Chhattisgarh
Goa Monsoon 2023: पावसाचा जोर वाढणार; पुढील दोन दिवस 'यलो' तर मंगळवारपासून गोव्यात 'ऑरेंज अलर्ट'

रंजन हरभजन सिंग (वय 34 वर्षे, रा. गुरुद्वारा रोड, टाटा नगर, झारखंड) असे अटक आरोपीचे नाव आहे. आरोपीच्या ताब्यातून 21 हजार 360 रूपये किमतीच्या 48 गोवा बनावटीच्या दारूच्या बाटल्या जप्त केल्या आहेत.

रंजन सिंग याच्याविरुद्ध अबकारी कायद्याच्या कलम 450/23 कलम 34 (2) नुसार पोलीस स्टेशन डोंगरगड येथे गुन्हा दाखल करण्यात आला.

वरिष्ठ पोलीस अधीक्षक अभिषेक मीना, अप्पर पोलीस अधीक्षक लखन पटले, पोलीस उपविभागीय अधिकारी डोंगरगड प्रभात पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली डोंगरगड पोलीसांकडून ही कारवाई करण्यात आली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com