Today's Goa News 19 Feb 2024: राज्यातील दिवसभरातील घडामोडी वाचा एका क्लिकवर

Goa Breaking News 19 February 2024: पणजी, म्हापसा, मडगाव तसेच राज्यातील महत्वाच्या घडामोडी....
Goa Live Updates 19 february 2024
Goa Live Updates 19 february 2024Dainik Gomantak

कोस्ट गार्ड मुख्यालय, गोवा येथे कमांड चेंज

गोवा येथील भारतीय रक्षक मुख्यालयाचे उपमहानिरीक्षक अरुणभ बोस, टीएम यांनी उपमहानिरीक्षक मनोज भाटिया, टीएम यांच्याकडे कमांड दिली. ICG कमांडर हे 1992 च्या बॅचचे कार्यकारी कॅडर अधिकारी आहेत.

ऑनलाईन व्यवहाराद्वारे 1.18 कोटींचा गंडा घालणाऱ्याला अटक

मुंबई क्राईम ब्रँचचा अधिकारी असल्याचे भासवून दोन महिन्यापूर्वी ऑनलाईन व्यवहाराद्वारे 1.18 कोटींना गंडा घालणाऱ्या केरळच्या अफलाल अब्दुनझर के. (27) याला सायबर कक्षाच्या पोलिस पथकाने शिताफीने अटक केली. यासंदर्भात सांकवाळ येथील 64 वर्षीय ज्येष्ठ नागरिक राजीव सहारिया यांनी सायबर कक्षाकडे गेल्यावर्षी डिसेंबर महिन्यात तक्रार दाखल केली होती.

लष्कर उपप्रमुखपदी लेफ्टनंट जनरल उपेंद्र द्विवेदी

लेफ्टनंट जनरल द्विवेदी यांनी आपल्या नवीन पदभार स्वीकारून राष्ट्रीय युद्ध स्मारक येथे भारताच्या शहीद वीरांचा सन्मान केला आणि त्यांच्या नियुक्तीचे गांभीर्य आणि महत्त्व अधोरेखित करून साऊथ ब्लॉक लॉन्स येथे त्यांना गार्ड ऑफ ऑनर मिळाला.

कोकण रेल्वेचे पीआय सुनील गुडलर यांना 'बायलांचो एकवोट' संघटनेकडून सन्मानपत्र

कोकण रेल्वेचे पीआय सुनील गुडलर यांना 'बायलांचो एकवोट' संघटनेकडून सन्मानपत्र देण्यात आले. गांधी मार्केट आणि मडगाव रेल्वे स्टेशनच्या पार्किंगमध्ये दोन अल्पवयीन बेवारस मुलांच्या शोधकार्याबद्दल हे सन्मानपत्र देण्यात आले.

महाराजाच्या पुतळाच्या बांधकामासाठी परवानगी नाही!

सां जुझे आरियल ग्रामपंचायतीचे उपसरपंच वेलंट फर्नांडिस यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळाच्या बांधकामासाठी परवानगी नसल्याचे सांगून गोवा राज्य पंचायत राज कायद्याअंतर्गत "स्टॉप ऑर्डर" नोटीस केली जारी

हणजूणमध्ये ग्रामस्थांचा कडकडीत बंद

हणजूणमध्ये ग्रामस्थांचा कडकडीत बंद. दिवसाअखेर व्यावसायिक आस्थापना सील करण्याबाबत मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्याचा स्थानिकांचा निर्धार. बंदमध्ये हणजूण व्यापाऱ्यांचा सक्रिय सहभाग

वाढत्या रस्ते अपघातांबाबत काँग्रेसचे पणजीत आंदोलन

राज्यातील वाढत्या रस्ते अपघाताबाबत गोवा प्रदेश काँग्रेसचे अमित पाटकर यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांचे परिवहन विभाग पणजी येथे धरणे आंदोलन. टुरिझम डायरेक्टर सुट्टीवर असल्याने संताप व्यक्त करत कार्यकारी संचालकांना बोलावण्याची आंदोलकांची मागणी. प्रश्नांची उत्तरे मिळेपर्यंत काँग्रेस ठिय्या आंदोलन करणार

आरक्षणासंदर्भातील प्रक्रिया आचारसंहिता लागू होण्याआधीपासूनच सुरु - CM सावंत

2027 च्या विधानसभा निवडणुकीत एसटी समाजाला आरक्षण देण्यासंदर्भात प्रक्रिया लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्याआधीपासूनच सुरु होईल अशी माहिती मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दिली. तसेच केंद्र सरकार याबाबत सकारात्मक असल्याचेही सावंत यांनी सांगितले आहे.

विशेष म्हणजे विधानसभेत आदिवासींना राजकीय आरक्षण देण्यासाठी सरकारने पावले उचलली असून मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखाली 16 फेब्रुवारीला दिल्लीत केंद्रीय आदिवासी कल्याणमंत्री अर्जुन मुंडा आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेण्यासाठी शिष्टमंडळ गेले होते.

मोदी सरकार अपयशी; माजी मंत्री खुर्शीद यांनी म्हादई, बेरोजगारी, ST आरक्षणावरुन केंद्रावर डागली तोफ

दुहेरी नागरिकत्व आणि ओसीआय कार्ड समस्या कोणत्याही राजकीय फायद्यासाठी नव्हे तर गोमंतकीयांची सेवा म्हणून शक्य तितक्या लवकर निकाली काढण्याची गरज आहे.

केंद्रात तसेच गोव्यात भाजपची सत्ता आहे. असे असूनही, म्हादई, बेरोजगारी आणि अनुसूचित जमातींसाठी राजकीय आरक्षणाचा प्रश्न सोडविण्यात पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखालील सरकार अपयशी ठरले आहे, असा आरोप माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सलमान खुर्शीद यांनी केला.

शिवजयंतीला दक्षिण गोव्यात काय घडलं?

दक्षिण गोवा सासष्टीतील सां जुझे दी अरीयाल येथे आज (सोमवार) शिवजयंतीच्या दिवशीच छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरुन वाद झाला.

समाजकल्याण मंत्री सुभाष फळदेसाई यांच्या हस्ते दुपारी या अश्वारुढ पुतळ्याचे उद्धाटन झाले. उद्धाटनानंतर फळदेसाई माघारी जात असताना पुतळ्याची उभारणी अवैध असल्याचे म्हणत जमावाने त्यांना घेराव घातला. वादानंतर मंत्री जात असताना त्यांच्यावर माती फेकण्यात आली.

जमीन विक्रीवरून लोबो-परब आमनेसामने!

कळंगुटचे आमदार मायकल लोबो आणि रिव्होल्युशनरी पार्टीचे मनोज परब यांच्यात बाहेरील लोकांना जमीन विकण्याच्या मुद्द्यावरून शाब्दिक चकमक झाली. जमीन संरक्षण आणि नियमन विधेयक विधानसभेत का मंजूर होत नाही? असा सवाल परब यांनी लोबो यांना केला.

महाराजांच्या पुतळ्यावरुन सां जुझे आरियलमध्ये तणाव! 

छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारणीवरून सां जुझे आरियल येथे तणावचे वातावरण. मोठ्या प्रमाणात पोलीस फौजफाटा तैनात. उभारणी कामाच्या उद्घाटनावेळी मंत्री सुभाष फळदेसाई यांच्यावर माती फेकण्याचा प्रकार घडला. याप्रकरणी परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी पोलिसांकडून लाठीचार्ज करण्यात आला.

मे अखेरपर्यंत पणजीतील सांडपाणी पाईपलाईनचा प्रश्न सुटेल: रॉड्रिग्स

पणजीच्या मध्यवर्ती भागात सांडपाणी पाईपलाईन आणि मॅनहोल टाकण्याचे काम येत्या 31 मे पर्यंत पूर्ण होईल. तसेच 18 जूनचा रस्ता आणि एमजी रोडचे कामही लवकरच हाती घेण्यात येईल. स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजीत रॉड्रिग्स यांची माहिती

सरकारने आमच्या संयमाची परीक्षा घेऊ नये! हणजूण ग्रामस्थ आक्रमक

सीआरझेडच्या मुद्यावरून उच्च न्यायालयाच्या निर्देशावरून हणजूण मधील व्यावसायिक आस्थापने सील करण्याच्या प्रक्रिया सुरू आहे. मात्र या विरोधात ग्रामस्थांनी निषेध म्हणून व्यावसायिक कामकाज थांबवून आज सोमवारी बंद पाळला. सरकारने या नियमांमध्ये विशेष दुरुस्ती करून लोकांना सवलत द्यावी. आमच्या संयमाची परीक्षा बघू नये, असे म्हणत ग्रामस्थ आक्रमक.

मुख्यमंत्र्यांकडून छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन!

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी साखळीतील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील महाराजांच्या पुतळ्याची पूजा करत महाराजांना अभिवादन केले.

आमदार डॉ. चंद्रकांत शेट्येंचे शिवरायांना अभिवादन

शिवजयंतीनिमित्त छत्रपती शिवाजी महाराज सरकारी शाळेच्या विद्यार्थ्यांनी काढली डिचोली शहरात मिरवणूक. आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये आणि प्रेमेंद्र शेट यांनी शिवरायांच्या पुतळ्याला अर्पण केला पुष्पहार.

उपोषणाला बसलेले भगवान हरमलकर पोलिसांच्या ताब्यात!

डिचोलीत उपोषणाला बसलेल्या भगवान हरमलकर यांना पोलिसांनी घेतले ताब्यात. छत्रपती शिवाजी महाराज बाजार संकुलातील गाळ्यात सुरू असलेल्या मद्यविक्रीच्या विरोधात ते उपोषणाला बसले होते. मात्र पोलिसांनी त्यांना उचलून स्थानकात नेले.

शिवजयंतीदिनी मद्यविक्री केल्याच्या निषेधार्थ डिचोलीत उपोषण!

डिचोलीतील छत्रपती शिवाजी महाराज बाजार संकुलातील गाळ्यात मद्यविक्री सुरू असल्याच्या निषेधार्थ माजी नगरसेवक भगवान हरमलकर शिवजयंतीदिनीच उपोषणाला बसले. जुन्या बसस्थानकावरील शिवरायांच्या पुतळ्याजवळ उपोषणाला सुरुवात.

डिचोलीत शिवजयंतीचा उत्साह

डिचोलीत शिवजयंतीचा उत्साह. छत्रपती शिवरायांच्या जयघोषात आणि शेकडो शिवप्रेमीच्या सहभागासह शिवजयंतीच्या प्रभातफेरीला सुरवात.

Shiv Jayanti 2024
Shiv Jayanti 2024Dainik Gomantak

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com