Goa Daily News Wrap: अस्मिताय दिवस, अपघात, गुन्हे, राजकारण संबधित दिवसभरातील बातम्यांचा आढावा एका क्लिकवर

Goa Breaking News 16 January 2024: पणजी, म्हापसा, मडगाव तसेच राज्यातील महत्वाच्या ब्रेकिंग न्यूज...
Goa Live Updates 16 January 2024
Goa Live Updates 16 January 2024

गोव्याच्या साक्षीला पॅरा अ‍ॅथलेटिक्समध्ये सुवर्ण, ब्राँझपदक

गोव्याची पॅरा अ‍ॅथलीट साक्षी काळे हिने राष्ट्रीय पातळीवरील पदक विजेती कामगिरी पुन्हा एकदा प्रदर्शित केली. बांबोळी येथील अ‍ॅथलेटिक्स स्टेडियमवर झालेल्या २२व्या राष्ट्रीय पॅरा अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेत तिने लांबउडीत सुवर्णपदक, तर १०० मीटर शर्यतीत ब्राँझपदक जिंकले.

धर्म, जात आणि भाषेरून लोकांमध्ये फूट पाडण्याचा भाजपचा प्रयत्न - माणिकराव ठाकरे

'भाजप धर्म, जात आणि भाषा यावरून लोकांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहे. गोवावासीय नेहमीच एकसंध राहिले आहेत. गोवावासीय काँग्रेससोबत आहेत. गोवावासीयांच्या भावनांचा आम्ही नेहमीच आदर करू,' असे गोवा काँग्रेस प्रभारी माणिकराव ठाकरे यांनी म्हटले आहे.

भाजप मोजक्या उद्योगपतींसाठी काम करतेय - खासदार फ्रान्सिस सार्दिन

काँग्रेसने संपूर्ण देश एकत्र आणला पण सध्याचे भाजप सरकार धर्माच्या आधारे लोकांमध्ये फूट पाडण्यात व्यस्त आहे. भाजप सामान्य लोकांसाठी नव्हे तर मोजक्या उद्योगपतींसाठी काम करतेय, असे खासदार फ्रान्सिस सार्दिन यांचे वक्तव्य.

कॉंग्रेसची जनमत कौल दिनीसभेला लोकांचा काढता पाय!

जनमत कौल दिनानिमित्त गोवा प्रदेश काँग्रेसने मडगांव लोहिया मैदानावर आयोजित केलेल्या सभेत हळू हळू लोकांचा काढता पाय. खुर्च्या झाल्या रिकाम्या.

रशियन पर्यटकाचा कोरगाव येथे अपघातात मृत्यू

कोरगाव-भटावाडीत झालेल्या दुचाकीच्या अपघातात रशियन पर्यटक पीटर (52) याचा मृत्यू झाला आहे. सोमवारी दुपारी 3.15 वाजता हरमलहून चोपडेच्या दिशेने जाताना हा अपघात झाला आहे.

मुलाचा खून करण्यापूर्वी का आली होती 'सीईओ सूचना' गोव्यात, पतीचे वकिल म्हणाले...

 एआय स्टार्टअपची सीईओ सूचना सेठ गोव्यात आपल्याच मुलाची हत्या केल्याच्या आरोपात अटकेत आहे. गोव्यातील एका हॉटेलमध्ये तिने ही हत्या केली.

दरम्यान, खूनाची घटना होण्यापूर्वी सूचना आपल्या मुलासह गोव्यात आली होती आणि पाच दिवस एका पंचतारांकित हॉटेलमध्ये राहिली होती, अशी माहिती समोर आली आहे.

जनमत कौलचे महत्त्व:

  • गोव्याची अस्मिता टिकली म्हणून आजचा दिवस अस्मिताय दिवस म्हणूनही साजरा केला जातो. 

  • यामुळे गोवावासीयांना त्यांचे राजकीय भवितव्य लोकशाही प्रक्रियेद्वारे ठरवता आले.

  • गोवा ओपिनियन पोलने या प्रदेशाच्या राजकीय स्थितीला आकार देण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली

  • वसाहतीनंतरच्या भारतीय इतिहासातील एक महत्त्वाची घटना म्हणून या दिवसाला लक्षात ठेवले जाते.

  • लोकशाही तत्त्वांप्रती असलेली बांधिलकी आणि त्यांचे राजकीय भवितव्य ठरवताना लोकांच्या इच्छेचा आदर या घटनेतुन दिसून आला आहे.

स्तनांच्या कर्करोगावरील अत्याधुनिक औषध मिळणार मोफत; गोवा आरोग्य खात्याचा कौतुकास्पद निर्णय

गोवा आरोग्य खात्याने महत्वाचा निर्णय घेतला असून, स्तानांच्या कर्करोगावरील अत्याधुनिक औषध मोफत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

पर्टूझूमॅब औषध मोफत दिले जाणार असल्याची माहिती राज्याचे आरोग्य मंत्री विश्वजीत राणे यांनी दिली आहे. यामुळे राज्यातील स्तानांच्या कर्करोगाने ग्रस्त असलेल्या महिलांना मोठा दिलासा मिळणार आहे.

लिंगभाट पर्रा येथील घराला आग

लिंगभाट पर्रा येथील महादेव मंदिराशेजारील एका घराला आग. म्हापसा अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत आग विझवली. घराच्या मालकीण लीला सावळ यांचे 30 हजारांचे नुकसान झाले. तर, 2 लाखांची मालमत्ता वाचवण्यात दलाच्या जवानांना यश.

पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांवर टीका करू नका! तानावडेंचा आदेश


भाजपातील अनेक नेत्यांनी पक्षासाठी मोलाचे योगदान दिले आहे. पक्षाला इथपर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांनी खूप कष्ट घेतले. त्यामुळे मनोहर पर्रीकरांसोबतच श्रीपाद नाईक, राजन आर्लेकर, सतीश धोंड, लक्ष्मीकांत पार्सेकर अशा ज्येष्ठ नेत्यांवर कोणताच आरोप किंवा टीका करू नये. गोव्यात सरकारनिर्मितीमध्ये यांचे विशेष सहकार्य आहे. त्यामुळे यांच्यावर कुणीही कोणतेच विधान करू नये. प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडेंनी केले आवाहन.

हेमोफिलीया रुग्णांवर होणार मोफत उपचार!

राज्यातील 4 हेमोफिलीया रुग्णांवर आरोग्य खात्याकडून मोफत उपचार. एका रुग्णावर वर्षाकाठी दीड ते दोन कोटींचा खर्च. राज्याच्या आरोग्य क्षेत्रात पहिल्यांदाच असा निर्णय. मंत्री विश्वजीत राणेंची माहिती.

झुआरी ॲग्रो कंपनीत अमोनिया वायूची गळती!

सांकवाळ बिर्ला येथे झुआरी ॲग्रो कंपनीच्या अमोनिया टाकीतून गॅस वाहिनीला गळती. साधारण 40 मिनिटे गळती झाल्याने गॅस हवेत पसरला. झुआरीच्या कामगारांकडून गळतीवर नियंत्रण. गॅस हवेत पसरल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण.

16 जानेवारी 'अस्मिता दिन' म्हणून साजरा करण्यात यावा!

राज्यात 16 जानेवारी हा दिवस 'अस्मिता दिन' म्हणून साजरा करण्यात यावा. अशी मागणी करणारे खासगी विधेयक येत्या अधिवेशनात सादर करणार असल्याचे आमदार विजय सरदेसाई यांची माहिती.

कळंगुटचे सरपंच सिक्वेरा यांचा सरकारला घराचा आहेर

मायकल लोबो उपसभापती असताना डॉ जॅक सिक्वेरा यांचा पुतळा विधानसभेत उभारला जाईल असे सांगितले होते. फातोर्डाचे आमदार विजय सरदेसाई यांनीही असेच आश्वासन दिले होते, परंतु दोघेही सिक्वेरा यांना सन्मान देण्यात अपयशी ठरले. कळंगुटमध्ये आमदार किंवा सरकारने कोणताही विकास केलेला नाही. पंचायत स्वत:चा निधी खर्च करून विकास करतेय, कळंगुटचे सरपंच जोसेफ सिक्वेरा यांचा सरकारला घराचा आहेर.

स्टंट करणं भोवलं; हरियाणाच्या पर्यटकाला अटक

पर्वरी येथील कोकेरो जंक्शन येथील बेदरकारपणे गाडी चालवत चालत्या जीपमध्ये उभा राहून स्टंट करणाऱ्या हरियाणातील विक्रम शर्मा (43) या पर्यटकाला पर्वरी पोलिसांनी अटक केली आहे. काल (सोमवार, 16 जानेवारी) हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यानंतर पोलिसांनी याबाबत कारवाई केली.

डिचोली पालिकेच्या मालमत्तेत दारू विक्री नको!

डिचोली पालिका मंडळाच्या बैठकीत बाजार संकुलातील गाळ्यांचा मुद्दा तापला. पालिकेच्या मालमत्तेत दारू विक्री नको. नगरसेवक ॲड. अपर्णा फोगेरी यांची मागणी.

मांडवी पुलाखाली कारचा अपघात

पणजीतील मांडवी पुलाखाली एका कारचा अपघात. कार डिव्हायडरला धडकल्यानंतर रस्त्यावर पलटी झाली. सुदैवाने यामध्ये कोणालाही दुखापत झाली नाही.

पर्वरीतील अपघातात दिव्यांग व्यक्तीचा मृत्यू

पर्वरीतील डेल्फीनोज् सुपरमार्केटजवळ जीप आणि दिव्यांग व्यक्तीच्या स्कूटरचा भीषण अपघात. पहाटे 4.30 वाजताची घटना. यामध्ये दिव्यांग व्यक्तीचा जागीच मृत्यू. सदर जीप ही भाड्याने दिली होती. पुढील तपास सुरू.

यंदाच्या पर्यटन हंगामात पर्यटक कमीच! किनारी भागातील व्यावसायिक चिंतेत

 राज्यात पर्यटन हंगाम सुरू होऊन दोन-तीन महिने होऊन गेले असले तरी यंदा म्हणावी तितकी पर्यटकांची रेलचेल दिसून येत नाही. गेल्यावर्षीच्या तुलनेत किनारी भागांमध्ये विदेशी पर्यटकांची कमतरता दिसून येते. याबाबत किनारी भागातील व्यावसायिकांनी चिंता व्यक्त केली आहे.

जाणून घ्या गोव्यातील आजचे पेट्रोल-डिझेलचे ताजे दर

गोव्यातील आजचे पेट्रोलचे दर खालीलप्रमाणे:

North Goa ₹ 97.54

Panjim ₹ 97.54

South Goa ₹ 97.11

गोव्यातील आजचे डिझेलचे दर खालीलप्रमाणे:

North Goa ₹ 90.10

Panjim ₹ 90.10

South Goa ₹ 89.68

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com