Goa Update 16 December 2023: चुकांतून बोध घेऊन ती चूक सुधारण्‍यासाठी प्रयत्‍न करणेही तेवढेच गरजेचे - न्यायमूर्ती देशपांडे

गोव्यातील दिवसभरातील ताज्या आणि ठळक घडामोडी
Goa Live News Update 16 December 2023
Goa Live News Update 16 December 2023Dainik Gomantak

चुकांतून बोध घेऊन ती चूक सुधारण्‍यासाठी प्रयत्‍न करणेही तेवढेच गरजेचे- न्यायमूर्ती देशपांडे

न्‍यायाधीशांसमोर सुनावणीस येणारे प्रत्‍येक प्रकरण हे नवीन असते त्‍यामुळे कित्‍येकवेळा ही प्रकरणे हाताळताना न्‍यायाधीशही चुका करतात. मात्र त्‍या चुका मान्‍य करण्‍याचे धाडस न्‍यायाधीशांनी दाखविले पाहिजे.

चुकांतून बोध घेऊन ती चुक सुधारण्‍यासाठी प्रयत्‍न करणेही तेवढेच गरजेचे असते असे मत मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भारत देशपांडे यांनी व्‍यक्‍त केले.

शनिवारी जीआर कारे कायदा महाविद्यालयाच्यावतीने आयोजित ‘‘जीआरके-ज्युडिशियरी टॉक्स’’ या व्याख्यानमालेत बोलताना न्यायमूर्ती देशपांडे म्हणाले की, “कधीकधी न्यायाधीशही चूक करतात.”

“आम्ही, न्यायाधीश म्हणून, आम्ही नेहमी बरोबर आहोत असा दावा करणार नाही, आम्ही चुकाही करतो. पण वस्तुस्थिती अशी आहे की चूक आहे हे मान्य करण्यात स्पष्टपणा असायला हवा.”

गोवा मुक्तीदिनी गोमंतकीयांना आनंदाचे क्षण अनुभवता येणार

गोवा मुक्तीदिनी गोमंतकीयांना आनंदाचे क्षण अनुभवता येणार आहे. गोवा मुक्ती दिनी म्हणजेच 19 डिसेंबर रोजी सकाळी 9.00 ते दुपारी 1.00 या वेळेत गोव्याचे राजभवन सर्वसामान्यांसाठी खुले असेल.

ज्या लोकांना राजभवन आणि पॅलेस पाहण्याची इच्छा आहे त्यांनी 18 डिसेंबर रोजी संध्याकाळी 6.00 वाजेपर्यंत राजभवनच्या मुख्य गेटवर नाव नोंदणी करावी असे सांगण्यात आले आहे. तसेच राजभवन पाहण्यासाठी येणाऱ्यांनी आपले फोटो आयडी आणि आधार कार्ड सोबत ठेवावे लागले.

एअर इंडियाच्या विमानात इंधन गळती; दुबईला जाणारे प्रवासी रखडले

दाबोळीहून दुबईला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानात इंधन गळती झाल्याची घटना उघडकीस आली असून सदर विमान फेरी रद्द करण्याची माहिती मिळाली आहे. प्रवासी रात्रीपासून ताटकळत असल्याचेही समजतेय

अल्पवयीनांच्या कृत्याने समाज हादरला

राज्यात सध्या गुन्हेगारीच्या घटनांना ऊत आला असून नुकतीच एक धक्कादायक बातमी हाती येतेय. एका अल्पवयीन मुलाने अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची घटना समोर आलीय.

पीडित मुलगी गर्भवती असल्याचे निदान झाल्याने हा गुन्हा उघड झाल्याचे बोलले जातेय. या घटनेप्रकरणी पणजी पोलिसांनी एफआयआर नोंदवला असून सदर अल्पवयीन मुलाला बाल न्याय मंडळासमोर हजर केले असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.

शापोरा येथील अपघातात दोघे गंभीर जखमी

राज्यातील अपघातांची मालिका दिवसेंदिवस वाढतच असून शनिवारी सकाळच्या सत्रात शापोरा येथे एक अपघात घडल्याची माहिती मिळतेय. पुण्याहुन गोव्यात आलेल्या पर्यटकाचा आपल्या कारवरील ताबा सुटला आणि कार उलटली असल्याची माहिती मिळाली आहे.

दरम्यान सदर पर्यटक आपली राखाडी रंगाची एमजी हेक्टर (गाडी क्र. MH 12 SL 2303) घेऊन शनिवारी सकाळी 7 च्या सुमारास शापोरा भागातील रस्त्यावरून निघाले होते. मध्येच त्यांचा कारवरील ताबा सुटला आणि त्याची कार रस्त्यातच उलटली.

कूळ मुंडकार कायद्याअंतर्गत 300 चौरस मीटरची घरे कायदेशीर करणार - मुख्यमंत्री

कूळ मुंडकार कायद्याअंतर्गत 300 चौरस मीटरची घरे कायदेशीर करणार. कूळ मुंडकार संबंधित सध्या 3,500 खटले प्रलंबित असून जिल्हाधिकारी व मामलेदार कार्यालये शनिवारी देखील खुली राहणार अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली.

परराज्यातील लोकांना जागा विकल्यास गोमन्तकीय कुठे जाणार? कृषी मंत्री रवी नाईक यांचा सवाल

परराज्यातील लोकांना जागा विकल्यास गोमन्तकीय कुठे जाणार? असा सवाल कृषी मंत्री रवी नाईक यांनी उपस्थित केला. तसेच, राज्यातील लोकांनी योजनांचा लाभ घेऊन उत्पन्न वाढवावे असा सल्ला देखील त्यांनी दिला.

दाबोळीतील अनेक काँग्रेस नेते संपर्कात - मंत्री माविन गुदिन्हो

दाबोळीतील अनेक काँग्रेस नेते संपर्कात आहेत. पण त्यांना पक्षात घेण्याबाबतचा निर्णय घाई-घाईने ने घेता योग्य छाननी करुन घेतला जाईल, अशी माहिती वाहतूक आणि पंचायत मंत्री माविन गुदिन्हो यांनी दिली.

गोव्याला केंद्राकडून मिळणारी हजार कोटी रुपयांचा IGST नुकसान भरपाई महसूल बुडाला - फेरेरा

गोवा सरकारने 2017 पासून महालेखा परीक्षक प्रमाणपत्र सादर न केल्याने राज्याला आंतरराज्य जीएसटीचा लाभ मिळत नाही. केंद्राकडून मिळणारी IGST नुकसानभरपाई हजार कोटी रुपयांचा महसूल बुडाला. अशी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सभागृहात कबूली दिल्याचे काँग्रेस आमदार कार्लुस फेरेरा म्हणाले.

बेती येथील नदी किनाऱ्यालगतच्या बेकायदेशीर होर्डिंगचा विद्युत पुरवठा बंद करा - HC

बेती येथील नदी किनाऱ्यालगतच्या बेकायदेशीर होर्डिंगचा विद्युत पुरवठा बंद करा, होर्डिंगवर अच्छादन टाकून कव्हर करा; उच्च न्यायालयाचे पेन्ह द फ्रॅन्का पंचायतीला आदेश.

शापोरा येथे कार अपघातात पुण्यातील पर्यटक जखमी

शापोरा येथे कारचा अपघात होऊन पुण्यातील वृद्ध पर्यटक जखमी झाला आहे. कार पलटी होऊन हा अपघात झाला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com