CM Pramod Sawant: कोवीडनंतर गोव्याची स्वयंपूर्णतेकडे वाटचाल; शासनाच्या योजनांचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा

CM Pramod Sawant: कृषी महोत्सव 2024 चे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन
CM Pramod Sawant
CM Pramod SawantDainik Gomantak

CM Pramod Sawant: कोवीड काळ गोव्यासाठी फार महत्वपूर्ण ठरला असून या काळाने स्वयंपूर्णतेचे महत्त्व आम्हाला दाखवून दिले. गोव्यात पुरातन काळापासून कृषी व्यवस्था असून भात लागवडीसह मत्स्य, भाजी व इतर प्रकारची उत्पादने घेतली जात होती.

काही काळानंतर हे सर्व बंद पडल्यावर गोव्यात सर्व गोष्टी बाहेरून आयात कराव्या लागू लागल्या. परंतु कोवीड काळानंतर सरकारने राबवलेल्या स्वयंपूर्ण योजना राबवून शासनाच्या हाकेला अनेकांनी चांगला प्रतिसाद डाया असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले.

साखळी रवींद्र भवनात कृषी खात्यातर्फे आयोजित करण्यात आलेल्या कृषी महोत्सव 2024 च्या उदघाटन सोहळ्यात मुख्यमंत्री बोलत होते. सोहळ्याला कृषी मंत्री रवी नाईक हे देखील उपस्थित होते.

यावेळी व्यासपीठावरून बोलताना मुख्यमंत्री सावंत म्हणाले, मोदींच्या विश्वसाहार्यतेमुळे शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्ड, पीक विमा, ड्रोन यांसारख्या सुविधा मिळू लागल्या आहेत.

विशेष म्हणजे पिकावरील औषध फवारणी करणारं पंजाब नंतर गोवा राज्य असून ही अभिमानाची गोष्ट असल्याचे त्यांनी सांगितले.

नाबार्डच्या सहकार्याने 12 तालुक्यांनमध्ये फार्मर प्रोड्युसिंग ऑर्गनायझेशन स्थापन करण्यात आलेय. यात ऍग्रीकल्चर, फीशी कल्चर, डेअरी कल्चर या सर्व बाबतीत इतर राज्यापेक्षा गोव्यात मोठयाप्रमाणावर मिळत असून शेतकरी वर्गाने याचा लाभ घ्यावा असे यावेळी मुख्यमंत्री सावंत यांनी सांगितले.

स्वयंपूर्ण योजनेच्या संकल्पनेतून सध्या गोवा फलोत्पादन महामंडळाद्वारे गोव्यातून भाजी निर्यात होऊ लागली आहे. विशेष म्हणजे ही सर्वात मोठी उपलब्धी आहे.

गोव्याच्या बाजारात आज स्थानिक लागवडीची उत्पादने विक्री होत आहे ही बाब समाधानकारक असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

या महोत्सवात स्थानिकांनी पिकवलेली भाजी, फळं, तसेच तांदळाच्या विविध प्रकारच्या जाती, आमसूल, कोकमाचा रस, नारळाच्या चुडतापासून तयार केलेल्या झाडू, बांबूपासून तयार केलेल्या वस्तू वस्तूंची मांडणी करण्यात आली होती. या प्रदर्शनात गृहउद्योग करणाऱ्या महिला वर्गाचा सहभाग मोठ्या प्रमाणावर दिसून आला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com