Goa Fire Cases: गोव्यात आगीच्या घटना; मडगावात दुकान जळून खाक तर कुळणमध्ये काजूच्या झाडांना आग

Fire Caught At Madgaon, Kulan Place in Goa: आगीचे प्रमाण एवढे होते की आग विझविण्यात अग्निशमनला दोन गाड्या वापराव्या लागल्या
Fire Caught At Madgaon and Kulan Places in Goa
Fire Caught At Madgaon and Kulan Places in GoaDainik Gomantak

Madgaon and Kulan Fire Cases:

मागील दोन दिवस गोव्यात अपघातांचे सत्र पहायला मिळाले होते. तर बुधवारी गोव्यात दुर्दैवाने आगीच्या घटना घडल्या आहेत. मडगावात बुधवारी (6 मार्च) बुधवारी पहाटे 5 वाजण्याच्या दरम्यान आग लागण्याचा प्रकार घडला.

या आगीत संपूर्ण दुकान जळून खाक झाले असून या दुकानाशेजारी असलेल्या अन्य एका दुकानालाही काही प्रमाणात याआगीची झळ बसली.

लोयोला हायस्कुलच्या मागे सज्जन नाईक यांच्या मालकीचे सेलिब्रेशन गिफ्ट कम स्टेशनरी शॉप नावाचे दुकान आहे. या दुकानात असलेले मौल्यवान गिफ्ट वस्तू, स्टेशनरी, कॉम्पुटर, झेरॉक्स मशीन, प्रिंटर सहित इतर वस्तू या आगीच्या भक्षस्थानी पडल्या आहेत.

या विषयी माहिती प्राप्त झाल्यानंतर मडगाव येथील अग्निशमन दलाच्या पथकाने तातडीने धाव घेतली. या दुकानाचे शटर बंद असल्याने अग्निशमन दलाला आग विझवण्यात अडसर निर्माण झाला होता.

त्यामुळे दुकानाचा मालक येईपर्यंत आग विझविण्यासाठी गेलेल्या अग्निशमन दलाच्या पथकाला ताटकळत थांबावे लागले. दुकान मालक आल्यानंतर दुकानाचे शटर उघडले असता वारा दुकानात गेल्याने लागलेली आग अधिकच फैलावली आणि संपूर्ण दुकान आगीच्या भक्षस्थानी पडले.

ही आग कशामुळे लागली यामागचे कारण समजू शकले नाही मात्र आगीचे प्रमाण एवढे होते की आग विझविण्यात अग्निशमनला दोन गाड्या वापराव्या लागल्या, अशी माहिती मडगाव अग्निशमन दलाचे प्रमुख गिल सौझा यांनी दिली.

Fire Caught At Madgaon and Kulan Places in Goa
Naval War College Video: गोव्यातील नौसेना युद्ध महाविद्यालय आतून कसे दिसते? पाहा व्हिडिओ

दुकानात हजारो रुपयांचा माल असून या आगीत हा सर्व माल जाळून गेला असून नुकसानीचा नेमका आकडा सांगू शकत नाही असे या दुकानाचे मालक सज्जन नाईक यांनी सांगितले

तर दुपारी 12.15 वाजण्याच्या सुमारास डिचोली-साखळी रस्त्याच्या बाजूने कुळण येथे माळरानाला आग लागल्याने रस्त्या लगतची काजूची झाडे पूर्णतः होरपळली आहेत.

आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले त्यांच्या प्रयत्नांमुळे आग नियंत्रणात येऊ शकली मात्र या आगीत जवळपास 30 हजाराहून अधिकचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com