Crime News : ड्रग्ज अहवाल विलंबामुळे संशयिताला सशर्त जामीन

या ड्रग्जचा अहवाल एफएसएलकडून आला नसल्याने त्यावरील सुनावणीही सुरू झालेली नाही.
Crime News
Crime News Dainik Gomantak

Crime News : पणजी, अडीच वर्षे उलटून गेली, तरी ड्रग्जप्रकरणी न्यायालयात सादर केलेल्या आरोपपत्रातील राज्य न्यायवैद्यक विज्ञान प्रयोगशाळेचा (एफएसएल) अहवाल सादर करण्यास विलंब झाल्याने विशेष न्यायालयाने नायजेरियन संशयित चिनेडू मंडे न्वाफोर याला सशर्त जामीन दिला.

संशयित चिनेडू मंडे न्वाफोर याला कोकेन, चरस, एमडीएमए, एक्स्टसी व एलएसडी ड्रग्जप्रकरणी नोव्हेंबर २०२० मध्ये कळंगुट पोलिसांनी किनारपट्टी परिसरातून अटक केली होती.

त्याच्याविरुद्ध न्यायालयात आरोपपत्र सादर केले होते. या ड्रग्जचा अहवाल एफएसएलकडून आला नसल्याने त्यावरील सुनावणीही सुरू झालेली नाही.

यावेळी चौथ्यांदा जामिनासाठी अर्ज केल्याने व अजूनही अहवाल न आल्याने त्याला पुन्हा जामीन नाकारणे योग्य होणार नाही.

हा अहवाल सकारात्मक आल्यास पोलिस त्याचा जामीन रद्द करण्यास न्यायालयात अर्ज करू शकते, असे निरीक्षण न्यायालयाने आदेशात नोंदवले आहे.

संशयिताने २५ हजार रुपयांची हमी व तत्सम रक्कमेचे दोन हमीदार सादर करावेत. त्याने नायजेरियन राजदूताकडून त्याच्या पासपोर्टची माहिती पोलिसांना द्यावी.

सुनावणीवेळी तो गोव्यात राहत असलेला पत्ता तसेच त्याचा मोबाईल क्रमांक तपास अधिकाऱ्यांना सुपूर्द केल्यावर त्याचीही पडताळणी करण्यात यावी. खटल्यावरील सुनावणीवेळी त्याने न्यायालयात उपस्थित राहावे.

त्याने अटींचे उल्लंघन केल्यास पोलिसांनी न्यायालयात अर्ज सादर करून तो रद्द करण्यासाठी विनंती करण्यास मुभा असेल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com