Goa Congress : खड्ड्यामधील पाण्यात हेल्मेट विसर्जित करून म्हापशात निदर्शने

साबांखा निष्क्रिय : सर्व मतदारसंघांत कॉंग्रेस छेडणार आंदोलन
Goa Congress
Goa Congress Dainik Gomantak

Goa Congress : सध्या भर पावसाळ्यात म्हापसा शहरासह राज्यातील प्रमुख रस्त्यांची तसेच महामार्गांची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. खड्डे चुकवि ताना तर कुठे खड्ड्यांतून रस्ते शोधताना नागरिकांना तारेवरची कसरत करावी लागते.

सार्वजनिक बांधकाम खात्याच्या दुर्लक्षामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. याच्या निषेधार्थ मंगळवारी (ता.२५) काँग्रेसतर्फे जुन्या आझिलोजवळील रस्त्यावर घुमट, टाळ वाजवत रस्त्यावरील खड्ड्यात साचलेल्या पाण्यात हेल्मेट विसर्जित करून सरकारचा अनोख्या पद्धतीने निषेध केला.

‘सजवूया, सजवूया..भाजपचे खड्डे सजवूया..!’ अशी गाणी म्हणत काँग्रेसने भर पावसात खड्ड्याभोवती रिंगण घालून भाजप सरकारच्या विकासाच्या दाव्यावर उपहासात्मक टीका केली.

काँग्रेसकडून सुरवातीला उत्तरेतील सर्व मतदारसंघांत टप्प्याटप्प्याने निदर्शने केली जाणार असून, नंतर दक्षिण गोव्यात आंदोलन छेडण्यात येईल, असे सांगण्यात आले.

Goa Congress
Monsoon in Goa - पावसामुळे कडशी नदीला पूर, 10 घरांचा संपर्क तुटला | Gomantak TV

सुदिन नाईक म्हणाले की, भाजपचे आमदार सरकारकडे पगार वाढविण्याची मागणी करतात. परंतु या आमदारांना सरकारकडून रस्ते दुरुस्त करून घ्यायला जमत नाही. यावेळी अ‍ॅड. शशांक नार्वेकर, संजय बर्डे, पार्वती नागवेकर यांनीही सरकारवर सडकून टीका केली.

विकास की भकास?

यावेळी काँग्रेसचे सरचिटणीस विजय भिके म्हणाले की, सरकारला फक्त पोलिस प्रशासनाचा वापर करून लोकांकडून महसूल गोळा करायचा आहे. इव्हेंटच्या नावाखाली सरकारकडून लूट सुरू आहे.

काही महिन्यांपूर्वीच जुन्या आझिलो परिसरातील या रस्त्याचे डांबरीकरण केले होते. परंतु, काही दिवसांतच पावसात हा रस्ता वाहून गेला. यातून भाजपच्या भकास विकासाचे दर्शन होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com