Viral Video: आठ आमदारांच्या पक्षांतरावर गोव्यातील पाद्रीचे भाषण चांगलेच व्हायरल

लाज नसलेल्या आठ आमदारांना परमेश्वरा सुबूद्धी दे - धर्मगुरू
Goa church pastor's speech viral
Goa church pastor's speech viral Dainik Gomantak

गेले काही दिवस गोवा राज्यात काँग्रेसला खिंडार पडणार असल्याची चर्चा होती, यातच गोवा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिगंबर कामत यांनी पक्षातील घडामोडींवरील आपली नाराजी स्पष्ट केली होती. आता हे खरं ठरलं असून गोवा काँग्रेसला खिंडार पडले आहे. आणि काँगेसच्या आठ आमदारांनी भाजमध्ये प्रवेश केला आहे. यावरुन गोव्यातील चिखली वास्को येथील एका चर्चच्या धर्मगुरूंनी आपले परखड मत व्यक्त केले असून राज्यातील सध्याच्या राजकिय स्थितीवर आपली नाराजी कठोर शब्दात व्यक्त केली आहे.

(Goa church pastor's speech on defection of eight MLAs went viral)

ही नाराजी व्यक्त करताना धर्मगुरूंनी म्हटले आहे की, परमेश्वराकडे गोव्यात जे काही सुरु आहे. त्यातून सामान्य जनतेची लवकरात लवकर सुटका व्हावी, अशी प्रार्थना आपण करुया, कारण गोव्याच्या लोकशाहीचा गळा घोटला जात असून हे काम गोव्यातील राजकारणी करत आहेत. परमेश्वराने त्यांना यापासून परावृत्त करावे अन् राज्यातील लोकशाही जिवंत राहावी.

Goa church pastor's speech viral
Goa Congress: काँग्रेसने पुनर्बांधणीसाठी कसली कंबर; सर्व गट समित्यांची करणार पुन्हा स्थापना

''लाज नसलेल्या आठ आमदारांना परमेश्वरा सुबूद्धी दे''

यावेळी बोलताना आक्रमक होत ते म्हणाले की लाज नसलेल्या आठ आमदारांना परमेश्वरा सुबूद्धी दे आणि ते जे काही करत आहेत. ती चुक त्यांच्या लक्षात यावी आणि त्यांनी आपली चुक सुधारण्यासाठी त्यांची बुद्धीपरावृत्त व्हावी.

Goa church pastor's speech viral
Goa Politics: पक्षांतरावर सुदिन ढवळीकर म्हणतात ‘कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे’

ज्या मतदासंघातील आमदारांनी पक्षांतर केले आहे. त्या मतदार संघातील आमदारांनी सोशल मिडियावरुन मेसेज पाठवत मतदारांच्या मनात गोंधळ निर्माण करु नये परमेश्वराने त्यांना सुबूद्धी द्यावी अन् मतदारांच्या हिताचे निर्णय त्यांच्याकडून घेतले जावेत. त्यामूळे राज्यातील राजकिय उलथापालथीवर धर्मगुरुंनी ही परखड शब्दात मत व्यक्त केल्याने यावरुन ही आता चर्चा रंगल्या आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com