Leopard Attack in Hasapur: चांदेल- हसापूरमध्ये बिबट्याचा धुमाकूळ; कुंभारवाड्यात पाळीव वासरावर हल्ला

Leopard Attack in Hasapur: संबंधित बिबट्याला वनखात्याने पिंजरा लावून त्याला पकडावे अशी मागणी होतेय
Leopard In Hasapur
Leopard In HasapurDainik Gomanak

Leopard Attack in Hasapur: राज्यात वन्यजीव मानवी वस्तीकडे फिरकत असल्याच्या घटना वाढत असून वाघ, बिबट्या सारखे प्राणी आपली भूक भागवण्यासाठी पाळीव प्राण्यांवर झडप घालून ठार मारत आहेत. अशाच प्रकारचे एक प्रकरण उत्तर गोव्यातील चांदेल - हसापूर येथून समोर आलंय.

कुंभारवाड्यात चांदेल - हसापूर येथे पंचायत क्षेत्रात बिबट्याने गेले अनेक दिवस धुमाकूळ घालत गोठ्यातील गुरांना आपले लक्ष्य केले आहे.

कुंभारवाडा येथील भरत भाईप यांच्या गुरांच्या गोठ्यात जाऊन गाईच्या वासराला हल्ला केला. सुदैवाने त्याच दरम्यान घरातील मंडळी जाग आली आणि ते उठल्यानंतर आरडाओरड केल्यानंतर सदर बिबट्या पळून गेला.

Leopard In Hasapur
School Bus Accident : बालरथ अपघाताचे कारण अजूनही अस्पष्टच

मात्र या बिबट्याने वासराच्या गळ्याला खोल केलीय. गेल्या अनेक दिवस या भागात बिबट्याचा संचार असल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय.

संबंधित बिबट्याला वनखात्याने पिंजरा लावून त्याला पकडावे अशी मागणी चांदेल - हसापूरचे नागरिक, सरपंच तुळशीदास गावस यांनी वन खात्याकडे केली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com