Dance Bar
Dance BarDainik Gomantak

Calangute: 'कळंगुटमधील अवैध पब-डान्सबार सील करा'; न्यायालयाचे प्रदूषण मंडळाला निर्देश

Calangute: कळंगुटमध्ये बांधकाम परवाना नसलेल्या इमारतींमधून डान्सबार सुरू असल्याचा खुलासा खुद्द कळंगुट पंचायतीनेच केला आहे.

Calangute: आवश्यक परवान्याविना सुरू ठेवलेल्या कळंगुटमधील 13 पब, बार आणि डान्सबारची छाननी करण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने दिलेय. तसेच नियमांचे पालन न करणारे पब, डान्सबार तातडीने सील करण्याचे आदेश राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाला देण्यात आले आहेत.

विशेष म्हणजे कळंगुटमध्ये बांधकाम परवाना नसलेल्या इमारतींमधून डान्सबार सुरू असल्याचा खुलासा खुद्द कळंगुट पंचायतीनेच केला आहे.

Dance Bar
Patna-Goa Flight: पाटणा-गोवा फ्लाईटसाठी मोठी गर्दी; तिकिट दर 10 हजार रूपयांवर

कळंगुट, बागा, हणजूण सारख्या किनारीभागात रात्रभर विनापरवाना सुरु असलेल्या डान्सबार, पब यांच्याविरोधात स्थानिक रहिवाश्यांनी वेळोवेळी तक्रारी दाखल करत आवाज उठवण्याचा प्रयत्न केलाय.

तसेच गोवा सरकारने देखील पर्यटनाचा दर्जा उंचावण्यासाठी प्रयत्न सुरु केले असून व्यावसायिकांना अवैधकृत्यांना आळा घालता यावा या उद्देशाने काही नियम लागू केले आहेत.

दरम्यान याचिकाकर्त्यांच्या म्हणण्यानुसार विनापरवाना सुरु असलेल्या डान्सबार मधून आलेल्या पर्यटकांचे आर्थिकदृष्ट्या शोषण केले जाते. मोठ्या आणि कानठळ्या बसवणाऱ्या आवाजातले संगीत सतत वाजत असून डान्सबारमालकांकडून वारंवार वेळेचे उल्लंघन होत असते.

रात्री 11 पर्यंत वेळेची मर्यादा असून सुद्धा हे बार पहाटेपर्यंत सुरु असतात. मात्र आता न्यायालयाने या सगळ्याला चाप बसावा यासाठी गोवा प्रदूषण नियंत्रण मंडळाला आदेश देण्यात आले आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com