पणजी: गोमंतक गौड समाजाचे उपाध्यक्ष व नावेली गावचे पंच सूर्यकांत पुरस गावडे यांची आज गोवा प्रदेश आदिवासी काँग्रेस समितीचे समन्वयक म्हणून नियुक्ती करण्यात आल्याची माहिती काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी आज दिली. त्यांना त्यांना नियुक्तीचे पत्र चोडणकर यांनी आज सुपूर्द केले.
यावेळी पत्रकार परिषदेत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी भाजपवर टीका करताना म्हणाले की भाजपने फक्त आदिवासींचा वापर राजकारणासाठी तसेच मते मिळवण्यासाठी केला. आदिवासींचे प्रश्न ते धसास लावू शकले नाही. भाजपचा उद्देश आदिवासी लोकांचे प्रश्न सोडविण्याचा नव्हता. अनुसूचित जमातीच्या लोकांचे असंख्य प्रश्न आहेत. नवनिर्वाचित समन्वयक सूर्यकांत गावडे यांचा या आदिवासी लोकांशी जवळचा संबंध आहे त्यामुळे ते समाजाचे नेतृत्व योग्य प्रकारे करून त्यांचे प्रश्न धसास लावतील असे मत चोडणकर यांनी व्यक्त केले.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.