Ramesh Tawadkar Fishing: सभापती रमेश तवडकर जेव्हा मासेमारी करतात... पाहा व्हिडिओ

राज्यात अद्याप पूर्ण क्षमतेने मासेमारीला सुरवात नाही
Ramesh Tawadkar Fishing
Ramesh Tawadkar FishingDainik Gomantak

Ramesh Tawadkar Fishing: गोव्यात 1 जून ते 31 जुलै हा काळ पावसाचा असल्याने तसेच समुद्रातील माशांचा विणीचा हंगाम असल्याने या काळात मासेमारी बंद असते. हा काळ उटलून आता राज्यात मासेमारीला सुरवातीला झाली आहे. त्यातच आता गोवा विधानसभेचे सभापती रमेश तवडकर यांचे मासेमारीसाठीच्या तयारीची छायाचित्रे सोशल मीडियातून समोर आली आहेत.

Ramesh Tawadkar Fishing
गोवा, महाराष्ट्राला मागे टाकत केरळची 'फाईव्ह स्टार' कामगिरी; 'या' क्षेत्रात पोहचले टॉपवर

दोन महिन्यानंतर 1 ऑगस्टपासून पुन्हा मासेमारीच्या हंगामाला सुरवात झाली आहे. त्या पार्श्वभुमीवर खूप दिवसांनी पुन्हा या कामात हातभार लावता आल्याचा आनंद त्यांना झाल्याचे दिसत होते.

या फोटोजमधून सभापती मासेमारीसाठी तयारी करताना दिसतात. पारंपरिक मच्छिमारांसोबत समुद्र किनाऱ्यावर रमेश तवडकर मासेमारीच्या कामात सहभाग घेताना दिसले. यात ते जाळे ओढण्यापासून, ते सोडविणे, त्यातून मासे काढणे, विविध प्रकारचे मासे वेगवेगळे करणे अशी कामे त्यांनी केली.

दरम्यान, सध्या राज्यात पूर्ण क्षमतेने मासेमारीला सुरवात झालेली नसली तरी किनारपट्टीवरील अनेक भागात मासेमारी सुरू झाली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com