Goa Agriculture : शेतकऱ्यांना बियाण्यांवर पन्नास टक्के मिळणार सवलत

Goa Agriculture : खरीप हंगामासाठी कृषी संचालनालय सज्ज : पीक उत्पन्नासाठी सर्वतोपरी मदत करणार
Goa Agriculture
Goa AgricultureDainik Gomantak

Goa Agriculture :

पणजी, राज्यात मान्सूनच्या आगमनाची चाहूल लागली असून येत्या ५ जूनपर्यंत मान्सून राज्यात दाखल होण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्यातील शेतकरी खरीप हंगामात पीक घेण्याच्या तयारीला लागला आहे.

राज्यात खरीप हंगामात प्रामुखाने भातशेती, भाजी, डोंगराळ भागात नाचणी तसेच इतर तुरळक पिके घेतली जातात त्याअनुषंगाने शेतकऱ्यांना शेतीची मशागत करावी लागते, उत्तम गुणवत्तेचे बियाणे निवडून त्याची पेरणी करावी लागते. यासाठी शेतकरी मोठ्या प्रमाणात कृषी संचालनालयावर अवलंबून असतात.

याबाबत सांगताना कृषी संचालक नेव्हील आल्फोन्सो म्हणाले, राज्यातील खरीप हंगामासाठी कृषी संचालनालय सज्ज झाले असून शेतकऱ्यांना पीक उत्पन्नासाठी सर्वतोपरी मदत संचालनालय करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Goa Agriculture
Goa Police: गस्त वाढवा, संशयास्पद व्यक्तींची धरपकड करा! वाढत्या चोरींच्या पार्श्वभूमीवर गोवा डिजीपींच्या पोलिसांना सूचना

भात, भाजी बियाण्यांवर ५० टक्के अनुदान

राज्यात खरीप हंगामात भात, भाजी, नाचणी तसेच इतर पिके घेतली जातात. राज्यातील शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी लागणारे भाताचे बियाणे, तसेच भाजीचे बियाणे ५० टक्के अनुमानाने पुरविण्यात येईल.

राज्यात मागील वर्षी शेतकऱ्यांनी नाचणीचे पीक घेतले यंदाही नाचणी लागवडीसाठी कृषी संचालनालयाद्वारे नाचणीचे बियाणे पुरविण्यात येणार आहे. खरीप हंगामासाठी कृषी संचालनालय सज्ज असून राज्यातील शेतकऱ्यांनी संचालनालयाद्वारे पुरविण्यात येणाऱ्या सवलतींचा लाभ घ्यावा असे आवाहन आल्फोन्सो यांनी केले.

नांगरणीसाठी ५० टक्के सवलत

राज्यातील शेतकऱ्यांना जमीन नांगरणीसाठी ५० टक्के सवलतीच्या दरात नांगरणी यंत्रणा पुरविली जाते . शेत नांगरणीसाठी कृषी संचालनालयाद्वारे टॅक्टर तसेच नांगरणी यंत्र, नांगरणी यंत्र चालविण्यासाठी कुशल कामगार हवा असेल तर तो देखील देण्यात येतो. या नांगरणीसाठी शेतकऱ्यांना ५० टक्के अनुदान देखील देण्यात येत असल्याचे संचालक आल्फोन्सो यांनी सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com