Goa Accident Case: चांदर येथे ट्रकांच्या धडकेत दोन तरुणांचा मृत्यू; सावर्डे गावावर शोककळा

Goa Accident Case: ट्रक आणि हे दोन्ही युवक दुचाकीसह उसळून बाजूच्या शेतात पडले.
Goa Accident Death
Goa Accident DeathDainik Gomantak

Goa Accident Case: दोन ट्रकांची एकमेकांशी टक्कर होऊन त्यातील एका ट्रकाने समोरून येणाऱ्या दुचाकीला धडक दिल्याने शुक्रवारी दुपारी चांदर येथे झालेल्या भीषण अपघातात तन्वेश नाईक (21) आणि श्रीकर नाईक (19) या दोन युवकांचा अंत झाला. हे दोन्ही युवक सावर्डे येथील असून त्यांच्या मृत्युमुळे सावर्डे गावावर शोककळा पसरली आहे.

आज दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीप्रमाणे, चांदरच्या मार्गावरून बॉक्साईट भरलेला ट्रक सावडेंच्या दिशेने जात होता. त्याच ट्रकच्या मागून ते दोघे येत होते.

विरुद्ध दिशेने हॉटमिक्सचे डांबर भरलेला ट्रक येत होता. हे दोन्ही ट्रक वेगाने जात होते. त्या दोन्ही ट्रकांची चाके एकमेकाला घासल्याने हॉटमिक्स भरलेल्या ट्रकचालकाचे वाहनावरील नियंत्रण गेले आणि समोरून येणाऱ्या दुचाकीला त्याने धडक दिली.

ही धडक एवढी भीषण होती की, ट्रक आणि हे दोन्ही युवक दुचाकीसह उसळून बाजूच्या शेतात पडले. तन्वेश आनंदवाडी-सावर्डे, तर श्रीकर टोनीनगर-सावर्डे या परिसरातील असून ते दोघेही एकमेकांचे जीवलग मित्र होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com