पोर्तुगीजांच्या खुणा पुसण्याची भाजपची ही मोडस ऑपरेन्डी; 'हेरिटेज बिल्डिंग्स' दुरावस्थेवरुन युरी आक्रमक

सरकारने इव्हेंट्सवर सार्वजनिक निधी वाया घालवण्यापेक्षा प्रथम या हेरिटेज संरचना जतन करण्यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे, असे युरी आलेमाव म्हणाले.
 Heritage Buildings In Goa
Heritage Buildings In Goa

Heritage Buildings In Goa: मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकार गोव्यातील मोडकळीस आलेल्या 'हेरिटेज बिल्डिंग्स' बाबत जाणीवपूर्वक 'गो स्लो' धोरणाचा अवलंब करत आहे.

गोव्यातील पोर्तुगीजांच्या खुणा पुसून टाकण्याची भाजप सरकारची ही मोडस ऑपरेन्डी असल्याचे दिसते, असा आरोप विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी केला.

गोव्यातील सर्व हेरिटेज इमारतींच्या दुरुस्ती, नूतनीकरण करण्यासाठी सरकारने नूतनीकरण कृती आराखडा त्वरित तयार केला पाहिजे, अशी मागणी युरी आलेमाव यांनी केली. सरकारने इव्हेंट्सवर सार्वजनिक निधी वाया घालवण्यापेक्षा प्रथम या हेरिटेज संरचना जतन करण्यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे, असे युरी आलेमाव म्हणाले.

 Heritage Buildings In Goa
Goa NCP: गोव्यात अजित पवार गटाला मिळाला नेता, प्रफुल्ल पटेलांकडून राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षाची नियुक्ती

काम्पाल, रायबंदर येथील जुने जीएमसी कॉम्प्लेक्स, मडगाव येथील हॉस्पिसिओ हॉस्पिटल, काम्पाल येथील मॅक्वीनेझ पॅलेस, पणजी येथील समाज कल्याण विभागाची इमारत, मडगाव येथील नागरी आरोग्य केंद्र यासारख्या हेरिटेज इमारती, होली स्पिरिट चर्चजवळील दक्षिण गोवा एज्युकेशन झोनल ऑफिस बिल्डिंग अशा वारसा वास्तूंची अवस्था अतिशय बिकट आहे. असे गेल्या विधानसभा अधिवेशनात सार्वजनिक बांधकाम विभागाने मला दिलेल्या माहितीवरून कळते.

सरकारने धोकादायक इमारतींच्या दुरुस्तीसाठी कोणतीही पावले उचलली नाहीत हे धक्कादायक आहे, असे युरी आलेमाव म्हणाले.

"मथनी सलधाना प्रशासकीय संकुल" असे नाव असलेल्या दक्षिण गोवा जिल्हाधिकारी कार्यालयाची इमारत देखील अतिशय खराब स्थितीत आहे हे पाहून मला धक्काच बसला. काम्पाल येथील रवींद्र भवन, मडगाव, बालभवन अॅनेक्सी, विविध सरकारी निवासी संकुले, प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि शाळांच्या इमारती देखील खराब स्थितीत असलेल्या इमारतीच्या यादीत आहेत, असे युरी आलेमाव यांनी सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com