आम्हाला ‘कंटेन्मेंट झोन’मधून मोकळे करा

Zuarinagar
Zuarinagar

मुरगाव
झुआरीनगर झोपडपट्टीतील रहिवाशी कोरोना पॉझिटिव्ह सापडल्यावर दक्षिण गोवा प्रशासनाने झुआरीनगर झोपडपट्टी ‘कंटेन्मेंट झोन’ घोषित करून लोकांना घरातच बंदिस्त केले आहे. जवळपास एक महिना लोक घरातच असल्याने तसेच कमाईचे कोणतेच स्त्रोत नसल्याने लोकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. प्रशासनाकडून वेळेवर जीवनावश्यक वस्तू मिळत नाहीत, मिळालेच तर ती अपुरी असते. यामुळे लोकांसमोर जीवन मरणाचा प्रश्न निर्माण झाला आहे.
झुआरीनगर झोपडपट्टीतील बहुतेक रहिवाशी मजूर आहेत. दैनंदिन रोजगारीवर ते काम करतात. त्यांची आर्थिक स्थिती हलाखीची झाली आहे. हातावर पोट असलेल्यांचा अक्षरशः छळ चाललेला आहे असा आरोप रहिवाशांनी केला असून स्थानिक आमदार, पंच सदस्य कोणतीच मदत करीत नाहीत, अशीही त्यांची तक्रार आहे.
‘कंटेन्मेंट झोन’मधील रहिवाशांची तपासणी करून कोण पॉझिटिव्ह - निगेटिव्ह ते प्रशासनाने शोधून काढावे. निगेटिव्ह असलेल्यांना मोकळे करावे, अशी मागणी रहिवाशांनी केली आहे. कोरोनाचे रुग्ण झुआरी कंपनीत सापडले आहेत, ती कंपनी न बंद करता झोपडपट्टीतील लोकांना बंदिस्त केले आहे, असे रहिवाशांनी यावेळी बोलून दाखविले.
दरम्यान, झुआरीनगरात रहिवासी रस्त्यावर उतरल्याने परिसरात वातावरण तंग झाले होते. लोकांना रोखून धरण्यासाठी पोलिसांचा चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

संपादन - यशवंत पाटील

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com