Goa News:...तर 35 लाख जप्‍त करणार!

Goa News: गोवा खंडपीठाचे संकेत : ताळगावात बेकायदेशीर डोंगरकापणी
Goa High Court
Goa High Court Dainik Gomantak

Goa News: ताळगाव येथे बेकायदेशीरपणे डोंगर कापून उभारण्यात आलेल्या बंगल्याशेजारी संरक्षक भिंतीचे काम पूर्ण होईपर्यंत बंगल्याचा मालक इस्तानिओ आल्मेदा याला 70 लाखांपैकी उर्वरित थकबाकी असलेली 35 लाखांची रक्कम जमा करण्याचे निर्देश देण्यात आले होते.

मात्र, ती जमा न केल्याने येत्या सोमवारपर्यंत (२६ फेब्रुवारी) अखेरची संधी मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने दिली आहे. ही रक्कम जमा न केल्यास जमा असलेली अर्धी ३५ लाखांची रक्कम जप्त करून त्यातून कामाची रक्कम वसूल करण्यात येईल, असे संकेत दिले आहेत.

या बेकायदा डोंगर कापणीप्रकरणी माजी आमदार व माजी महापौर टोनी रॉड्रिग्ज यांनी उच्च न्यायालयात जनहित याचिका सादर केली होती.

Goa High Court
बेकायदेशीर प्‍लॉट पाडण्‍यासाठी पुतळ्याचे कारस्‍थान? क्रूझ सिल्‍वा यांनी व्यक्त केली शंका

डोंगर कोसळण्याची भीती

आल्मेदाने ताळगाव येथे मोठ्या प्रमाणात डोंगरकापणी करून तेथे आलिशान बंगला बांधला आहे. त्‍यामुळे तेथे डोंगर कोसळण्याचा धोका आहे. तसेच ही डोंगरकापणी बेकायदेशीर असल्याचे याचिकेत नमूद करण्यात आले होते. सर्व नियम धाब्यावर बसवून राजकीय आशीर्वादाने त्याने बांधकाम केले होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com