यंदा प्रथमच वास्को सप्ताह होणार साध्या पद्धतीने

Damodar Mandir
Damodar Mandir

मुरगाव
वास्को सप्ताह म्हणजे आबाल वृद्धांना एक पर्वणी असायची. श्रावण महिना सुरू होताच नागपंचमीच्या दुसऱ्या दिवशी गेली १२२ वर्षे जोशी कुटुंबाच्या सालात स्थापन करण्यात आलेल्या दामोदर मंदिरात हा राज्याचा एक प्रमुख उत्सव देहभान विसरून साजरा केला जायचा. यंदा तो रविवारी २६ जुलै रोजी होणार आहे, पण कोरोनाने उत्सवातील आनंद हिसकावून घेतल्याने फक्त पहिल्या दिवसाच्या धार्मिक विधी पुरताच वास्को सप्ताह साजरा करण्याचे उत्सव समितीने ठरविले आहे. परिणामी पंधरा दिवसांपर्यंत वास्को सप्ताहाचा आनंद लोकांमध्ये असायचा तो यंदा राहणार नाही.
वास्को सप्ताह उत्सवात सर्वचजण रममान होऊन सहभागी व्हायचे. संगीत मैफली, मंदिरातील अखंड चोवीस तास भजन, पौराणिक देखावे असलेले पार घेऊन मंदिरापर्यंत येणाऱ्या दिंड्या, त्याच बरोबर शहरातील विविध वस्तूंची फेरी या सर्वांना यंदा लोकांना मुकावे लागले आहे. वास्को सप्ताहामुळे मुरगाव पालिकेच्या तिजोरीत ५०-६० लाख फेरीतील दुकांनामुळे जमत होते, ते यंदा जमणार नाहीत. त्यामुळे सर्वांचा आनंद हिसकावून घेतलेल्या या कोरोनामुळे अनेकांना आर्थिक नुकसानही सोसावे लागले आहे. फुल विक्रेत्यांची कमाई कोरोनाने हिसकावून घेतली आहे. गोव्यातील पारंपरिक मिठाई, खाजे विक्रेते यंदा मुकले आहेत.
वास्को सप्ताह उत्सव थोडक्यात साजरा करण्याची तयारी उत्सव समितीने केली आहे. मंदिराला थोडक्यात विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.

संपादन - यशवंत पाटील

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com