Fake Receipts : बनावट पावत्या देऊन घरपट्टी उकळली

Fake Receipts : घर क्रमांकांसाठीही घेतले पैसे : किर्लपाल दाभाळ सरपंचांकडून चौकशीची मागणी
Fake Receipts
Fake Receipts Dainik Gomantak

Fake Receipts : फोंडा,किर्लपाल दाभाळ पंचायत क्षेत्रात मागील १० वर्षांपासून पंचायतीची बनावट पावती देऊन घरपट्टी उकळण्याचा प्रकार उघडकीस आला असून यात लाखो रुपयांचा घोटाळा झाला आहे.

बनावट पावत्यांमुळे लोकांत खळबळ उडाली असून या प्रकाराची सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी सरपंच दामोदर बांदेकर यांनी केली आहे. पंचायत क्षेत्रात गेल्या वर्षभरात अनेकांना घर क्रमांक देण्यासाठी मोठ्या प्रमाणात रक्कम घेऊन बनावट पावत्या दिल्या आहेत.

तसेच बनावट पावत्या देऊन घरपट्टीही आकारली आहे, असे काही लोकांनी सरपंच बांदेकर यांच्या निर्दशनास आणून दिले असता बांदेकर यांनी या पावत्यांची पंचायत कार्यालयात खातरजमा केली असता पावत्या बनावट निघाल्या, असे बांदेकर यांनी सांगितले.

घर क्रमांक मिळवण्यासाठी पैसे दिलेल्या काही लोकांची सध्या तारांबळ उडाली आहे. आपले पैसे बुडाल्याची चिंताही या लोकांना आहे. सप्टेंबरमध्ये पदाचा ताबा घेतल्यानंतर काही लोकांनी हा प्रकार आपल्या निदर्शनास आणून दिला, असे बांदेकर यांनी सांगितले.

Fake Receipts
Pub House In Goa: भाजप उपाध्यक्षाचे पब हाऊस सील; वेश्‍या व्यवसाय रोखला

गटविकास अधिकाऱ्यांकडे तक्रार करणार

याबाबत आपण तोंडी तक्रार गटविकास कार्यालयात यापूर्वी केली आहे. लवकरच गट विकास अधिकाऱ्यांकडे याबाबत तक्रार करण्यात येईल, असे बांदेकर यांनी सांगितले.

बनावट पावत्या देताना पंचायतीचा शिक्का वापरण्यात आला आहे. या पावत्या आपण गट विकास अधिकाऱ्यांकडे सादर करणार आहे, असे बांदेकर यांनी सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com