President Murmu Goa Visit |Goa's common civil code
President Murmu Goa Visit |Goa's common civil codeDainik Gomantak

Goa Common Civil Code: गोव्यातील समान नागरी संहितेचे राष्ट्रपती मुर्मू यांच्याकडून कौतुक, म्हणाल्या देशासाठी...

गोव्याने समान नागरी संहिता स्वीकारणे हे देशासाठी सर्वोत्तम उदाहरण आहे - राष्ट्रपती मुर्मू
Published on

President Droupadi Murmu On Goa's common civil code: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू गोव्यातील समान नागरी संहितेचे (common civil code) कौतुक केले. गोव्याने समान नागरी संहिता स्वीकारणे हे देशासाठी सर्वोत्तम उदाहरण आहे. असे वक्तव्य मुर्मू यांनी केले. राष्ट्रपती मुर्मू यांनी राजभवनात त्यांच्या सन्मानार्थ राज्य सरकारने आयोजित केलेल्या नागरी स्वागत समारंभात हे वक्तव्य केले.

राष्ट्रपती मंगळवारपासून तीन दिवसांच्या गोवा दौऱ्यावर आहेत, राजभवनात आज त्यांचा नागरी सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांच्या हस्ते निवडक लाभार्थ्यांना वन हक्क कायद्यांतर्गत सनद वाटप करण्यात आले. 

गोव्याने सर्व समाजातील स्त्री-पुरुषांना समान अधिकार देणारी समान नागरी संहिता स्वीकारली ही अभिमानाची बाब आहे. गोव्याच्या कॉस्मोपॉलिटन समाज संस्कृतीचे ते उत्तम उदाहरण आहे. ही समान नागरी संहिता आपल्या देशासाठी एक उत्तम उदाहरण आहे. असे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू म्हणाल्या.

राष्ट्रपतींनी काही लाभार्थ्यांना वनहक्क कायद्यांतर्गत 'सनद' वाटप केले. गोव्यात समृद्ध वनक्षेत्र आहे. ते संरक्षित केले पाहिजे. असे यावेळी त्या म्हणाल्या. तसेच, राष्ट्रपती मुर्मू यांनी शाश्वत विकास लक्ष्यांवर गोव्याने केलेल्या प्रगतीचे कौतुक केले.

याशिवाय उच्च शैक्षणिक संस्थांमध्ये महिलांची संख्या 60 टक्क्यांहून अधिक आहे, मात्र महिलांचा कार्यशक्तीमध्ये सहभाग वाढवण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.

President Murmu Goa Visit |Goa's common civil code
भाषणाची सुरूवात आणि शेवट कोकणीत, राष्ट्रपती गोव्यातील नागरी सत्कारानंतर काय बोलल्या?

गोव्यातील लोक त्यांच्या चांगल्या आदरातिथ्यासाठी ओळखले जातात त्यामुळे या राज्यात मोठ्या प्रमाणात पर्यटक येतात. यासाठी मी तुम्हा सर्वांचे अभिनंदन करते. पर्यटन केंद्र असण्याबरोबरच, गोवा हे शिक्षण, व्यापार आणि वाणिज्य, उद्योग, तंत्रज्ञान आणि संरक्षणाचे महत्त्वाचे केंद्र म्हणूनही ओळखले जाते. असे गौरवोद्गार त्यांनी काढले.

याशिवाय मुर्मू यांनी राज्यातील कलाकार, खेळाडू आणि पारंपरिक व्यावसायिक यांचे देखील कौतुक केले. त्यांनी भाषणाचा शेवट देखील कोकणीत केला. देव बरें करू असे म्हणत त्यांनी भाषण संपवले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com