'दूरदर्शन’च्या कार्यक्रमांना कात्री

Doordarshan programs have been reduced
Doordarshan programs have been reduced

पणजी:  पणजी दूरदर्शनवरून राष्ट्रीय वाहिनीचे कार्यक्रम दाखवण बंद केल्याने प्रेक्षकांत नाराजी आहे. पूर्वी बातम्या दाखवल्या जाणाऱ्या डीडी न्यूज वाहिनीवर आता दूरदर्शनच्या जाहिराती दाखवल्या जातात आणि विविध भारतीवरील कार्यक्रम ऐकवले जात आहेत.गेले दोन महिने हा प्रकार सुरू असल्याची धक्कादायक माहिती मिळाली आहे.  विविध खासगी वाहिन्यांच्या स्पर्धेत दूरदर्शनला टिकण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आह. त्यातच राष्ट्रीय वाहिनीचे कार्यक्रम दाखवणं बंद करून पणजी दूरदर्शनने आपले प्रेक्षक दुसरीकडे ढकलणे सुरू केल्याचे दिसते.

दूरदर्शनच्या पणजी केंद्राच दोन ट्रान्सफॉर्मर आहेत. एक जास्त क्षमतचा, तर दुसरा कमी क्षमतेचा आहे. हे ट्रान्सफॉर्मर २०० सालापासून कार्यरत आहेत. यापैकी पहिल्या ट्रान्सफॉर्मरवरून सकाळी साडपाच ते सहा  दिल्लीचे तर सकाळी ६ ते ९ मुंबईच्या  सह्याद्री वाहिनीच कार्यक्रम सहप्रक्षेपित केल जायचे. सकाळी ९ ते दुपारी ४ वाजपेर्यंत राष्ट्रीय वाहिनीचे कार्यक्रम सहप्रक्षेपित केल जात असत. दुपारी ४ ते सायं. ७ वा.पर्यंत स्थानिक कार्यक्रम दाखवल जातात, तर सायं. ७ ते १२.३० वा. राष्ट्रीय वाहिनीचे कार्यक्रम दाखवले जात असत.

दूरदर्शनच्या दुसऱ्या ट्रान्सफॉर्मरवरून सुरूवातीला मेट्रो करमणुकीचे कार्यक्रम दाखवले जात, नंतर डीडी न्यूज या वाहिनीचे कार्यक्रम सहप्रक्षेपित केल जात असत. पूर्वी दूरदर्शनच्या मनोऱ्यांवरून हेे कार्यक्रम सहप्रक्षेपित केले जात असत. आता पणजी दूरदर्शनच रुपांतर उपग्रह वाहिनीत केल्यानंतर  राष्ट्रीय वाहिनीचे कार्यक्रम प्रक्षेपित करण बंद केले आहेत. त्याऐवजी दूरदर्शनच्या कार्यक्रमांचे प्रोमोज दाखवण्यात येतात. दुसरा ट्रान्सफॉर्मर बंद करण्यात आला आहे. केवळ चार ते सायंकाळी सात यावळेसाठी प्रेक्षकांनी पणजी दूरदर्शनकडे वळावे, अशी अपेक्षा अहोरात्र करमणुकीचे कार्यक्रम अनेक वाहिन्यांवर उपलब्ध असण्याच्या जमान्यात करण  म्हणजे फारच झाले. अशाने पणजी दूरदर्शनच्या प्रेक्षकांना गळती लागली तर नवल त कसले?

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com