कचरा समस्‍येबाबत राजकारण नको

 Don't politicize the waste issue
Don't politicize the waste issue

नावेली : मडगाव पालिका मंडळाचा कार्यकाळ ५ नोव्हेंबर रोजी संपत आहे. गुरुवारी पालिका मंडळाची शेवटची बैठक झाली. या बैठकीत भाजपा व काँग्रेस पुरस्कृत नगरसेवकांनी प्रकल्पाच्या खर्चावर आक्षेप घेत बैठकीत नगराध्यक्षांना प्रश्न विचारला. तरीही नगराध्यक्ष पूजा नाईक यांनी नगरसेवकांचा विरोध न जुमानता ठराव मंजूर केला.

सोनसोड्यावर बायोमिथेशन प्रकल्प उभारण्यासाठी घन कचरा व्यवस्थापन खात्याचे मंत्री मायकल लोबो यांनी पालिका मंडळाची बैठक घेऊन ठराव मंजूर करण्यास सांगण्यात आले होते. त्याप्रमाणे पालिकेची बैठक बोलावण्यात आली. मात्र, नगरसेवकांनी सोनसोड्यावर कोणत्या कामासाठी पालिका एवढा पैसा खर्च करीत आहे, याची माहिती देण्याची मागणी केली असता साहाय्यक अभियंता विशांत नाईक गांवकर यांनी माहिती देण्यास सुरवात केली असता नगरसेवक आर्थुर डिसिल्वा यांनी सरकार सोनसोड्यावर बायोमिथेशन प्रकल्पासंबंधी ‘सेटिंग’ झाल्याचा आरोप केला.

मुख्यमंत्री कथित ‘सेटिंग’ करतात, आम्हाला त्‍याची सवय नाही, असा आरोप होताच नगरसेवक आर्थुर व रुपेश महात्मे यांनी मुख्यमंत्र्यांबद्दल असे अपशब्द खपवून घेणार नाही, असे सांगत नगरसेवकांनी गदारोळ माजवला. यावेळी त्यांना डोरिस टेक्सेरा व मनोज मसुरकर केतन कुरतरकर यांनी पाठींबा दिला व बैठकीत एकच गदारोळ माजला होता.


मडगावात कचरा समस्या फार हा ज्वलंत विषय बनला आहे. हा प्रश्न पालिका मंडळाने एकत्र येऊन सोडवला पाहिजे. परंतु, काही नगरसेवक या मुद्यावर राजकारण करत कचऱ्याचा प्रश्न सोडविण्यात त्यांना स्वारस्य नसल्याचे दिसून येत आहे.
गुरुवारी मडगाव पालिकेत भाजप व काँग्रेस पुरस्कृत नगरसेवक एकत्र येऊन सत्ताधारी गोवा फॉरवर्ड पक्षाच्या नगराध्यक्षा पूजा नाईक यांना सोनसोड्यावरील बायोमिथेशन प्रकल्पाच्या खर्चावर आक्षेप घेत बैठकीत गदारोळ माजवल्याने या विरोध करणाऱ्या नगरसेवकांना मडगावातील कचरा समस्या सोडवण्यासाठी काहीच पडलेले नाही, असा प्रश्न मडगावातील नागरिकांना पडला आहे.

पर्यटन शुल्क ५० टक्क्यांनी माफ

म्हापसा मडगाव नगरपालिकेच्या प्रतिछाया-मंडळावर कचरा व्यवस्थापन मंत्री मायकल लोबो यांनी टीका केली असून, सोनसोडो येथील कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी कचरा व्यवस्थापन महामंडळाबरोबर एकत्रित काम करण्याचे टाळले असून, तेच मंडळ तेथील कचऱ्याला जबाबदार आहे, असा आरोपही त्यांनी केला आहे. 
मंत्री लोबो यांनी सोनसोडो येथील कचरा हाताळणी यंत्रणेची पाहणी करण्यासाठी तिथे भेट दिली होती. लोबो यांनी तात्पुरता पर्याय काढण्याचे आश्वासन त्या वेळी दिले होते. सोनसोडोला साळगावसारख्या जागतिक दर्जाचे कचरा हाताळण्याचे प्रकल्प हवे असतील तर स्थानिक आमदार, नगरसेवक आणि स्थानिकांनी एकजुटीने उभे राहून या उपक्रमाला पाठिंबा दिला पाहिजे, असेही त्यांनी त्या वेळी म्हटले होते. फातोर्डाचे आमदार विजय सरदेसाई, मडगावचे आमदार दिगंबर कामत यांनी स्वत:च्या समर्थकांसह सोनसोडो येथे एकत्र येऊन मंत्री मायकल लोबो यांना काळे झेंडे दाखवून निषेध व्यक्त केला होता. त्यासंदर्भात ते बोलत होते म्हापसा येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत मंत्री लोबो म्हणाले की, मडगावमधील काही नगरसेवक या मुद्द्यावर राजकारण करत असल्यामुळे सोनसोड्याचा प्रश्न अजूनही सुटलेला नाही; तथापि, गोव्यातील कचऱ्याची समस्या सोडवण्यासाठी कचरा व्यवस्थापन महामंडळ आणि कचरा व्यवस्थापन मंत्री एकत्र येऊन काम करतील, असेही ते म्हणाले.
घनकचरा व्यवस्थापन महामंडळ हे एकमेव माध्यम आहे की आहे की ही समस्या सोडवू शकते आणि सळगाव येथील कचरा प्रक्रिया प्रकल्प उभारून आम्ही ते सिद्ध करून दाखवले आहे, असेही लोबो म्हणाले.  ही प्रक्रिया संथ गतीने होईल; पण, कचऱ्याच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी आम्ही निश्चितच यशस्वी ठरणार आहोत, असे लोबो यांनी स्पष्ट केले. पराभूत झालेले काही नगरसेवक आणि आगामी निवडणूक लढवण्यास इच्छुक असलेले काही नगरसेवक कचऱ्याच्या मुद्द्यावर राजकारण करण्याचा प्रयत्न करत आहेत.
 

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com