कोविड मृतांवर अंत्यसंस्कार करण्यास कोणीही आडकाठी आणु नये

dont create any difficulty while cremating covid dead bodies
dont create any difficulty while cremating covid dead bodies

पणजी: कोविड महामारीच्या(Corona) संकटाने आज संपुर्ण जगात हाहाकार केला आहे. शेकडो लोकांचे प्राण जात आहेत. कोविडच्या संसर्गाने मृत झालेल्यांना सन्मान देणे व त्यांच्यावर योग्य प्रकारे अंत्यसंस्कार(Funeral) करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. कोविड मृतांवर अंत्यसंस्कार करण्यास कोणीच आडकाठी आणु नये अशी कळकळीची विनंती गोवा प्रदेश कॉंग्रेस(Goa pradesh congress committee) समितीचे सरचिटणीस अमरनाथ पणजीकर(Amarnath Panajikar)यांनी केली आहे.(dont create any difficulty while cremating covid dead bodies)

काल बस्तोडा येथे घडलेला प्रकार गोव्यात परत घडू नये यासाठी सरकारने त्वरित पाऊले उचलावित अशी मागणी अमरनाथ पणजीकर यांनी केली असुन, गोमंतकीयांनी कसल्याही अपप्रचाराला बळी न पडता आपल्या गांवच्या कोविड बाधीत मृतांवर अंतिम संस्कार करण्यास मदत करावी असे आवाहन त्यांनी केले आहे.

कोविडची बाधा होऊन मृत पावलेल्या व्यक्तिपासुन कोविडचा संसर्ग होतो हा केवळ भ्रम आहे. प्रत्येकाने मास्क वापरुन तसेच योग्य काळजी घेवुन काम केल्यास कोविडवर नियंत्रण मिळवीणे सोपे होणार आहे. आज जात-पात-धर्म बाजूला ठेवुन प्रत्येकाने शक्य होईल त्याप्रमाणे मदतीसाठी पुढे येणे गरजेचे आहे. 

आज कोविड इस्पितळात काम करणारे डॉक्टर, नर्सेस व इतर कर्मचारी, रुग्णवाहिका चालविणारे चालक व कर्मचारी, शववाहिका चालक व वाहक यांनी  वेगळी भूमिका घेतल्यास रुग्णांवर उपचार करणे कठिण होणार आहे व मृतदेह हाताळण्याचे एक संकट उभे राहणार आहे असे अमरनाथ पणजीकर म्हणाले.

गोव्यातील प्रत्येक पंचायत व नगरपालीका मंडळानी स्मशानभूमी व्यवस्थापन मंडळ तसेच दफनभूमी व्यवस्थापन मंडळाना विश्वासात घेवुन कोविड मृतांवर अंतिम संस्कार करण्यासाठी योग्य उपाययोजना करावी अशी मागणी अमरनाथ पणजीकर यांनी केली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com