Diwali Special Train : दिवाळीच्या सुट्टीत खास रेल्वे गाड्यांची व्यवस्था

लोकमान्य टिळक स्टेशनवरून १ ते २९ नोव्हेंबरदरम्यान बुधवार, शनिवार व सोमवार असे तीन दिवस रात्री १०.१५ मिनिटांनी सुटेल व थिवी येथे दुसऱ्या दिवशी सकाळी १० वाजता पोहोचेल.
 Trains
TrainsDainik Gomantak

Diwali Special Train : सासष्टी, दिवाळी सुट्टीत मध्य रेल्वेने खालील खास रेल्वे प्रवासी गाड्यांची व्यवस्था केली आहे. त्यामुळे या दिवसांमध्ये प्रवाशांची जी गर्दी होणार आहे त्यावर नियंत्रण ठेवणे शक्य होणार आहे.

१) ट्रेन क्रमांक ०११२९ - लोकमान्य टर्मिनस ते थिवी (स्पेशल आठवड्यांतून तिनदा)- ही गाडी लोकमान्य टिळक स्टेशनवरून १ ते २९ नोव्हेंबरदरम्यान बुधवार, शनिवार व सोमवार असे तीन दिवस रात्री १०.१५ मिनिटांनी सुटेल व थिवी येथे दुसऱ्या दिवशी सकाळी १० वाजता पोहोचेल.

२) ट्रेन क्रमांक ०११३० - थिवी ते लोकमान्य टर्मिनस - ही गाडी थिवीहून २ ते ३० नोव्हेंबरदरम्यान गुरुवार, रविवार व मंगळवार या दिवशी दुपारी 3 वाजता सुटेल व लोकमान्य टिळक स्थानकावर दुसऱ्या दिवशी सायंकाळी ४.०५ वाजता पोहोचेल.

ही गाडी ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, संगमेश्र्वर, रत्नागिरी, वैभववाडी, नंदगाव, कणकवली, सिंधदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी या स्थानकांवर थांबतील. या गाडीला २१ कोच असतील.

त्यातील वातानुकुलित एसी १ - १, टू टीयर एसी २, ३ टीयर ४, स्लिपर २ व जनरल १० कोच असतील.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com