Dainik Gomantak: दैनिक ‘गोमन्तक’च्या शिरपेचामध्ये मानाचा तुरा

Dainik Gomantak: दिवाळी अंकाला महाराष्ट्रातील ख्यातनाम संस्थांचे मानाचे दोन पुरस्कार
Dainik Gomantak
Dainik Gomantak Dainik Gomantak

Dainik Gomantak: ‘गोमन्तक’च्या यंदाच्या दिवाळी अंकाला महाराष्ट्रातील मानाचे दोन पुरस्कार घोषित झाले आहेत. मराठी वृत्तपत्र लेखक संघ, मुंबई आणि ‘दर्पण’कार बाळशास्त्री जांभेकर पत्रकार संघ- कलाकुंज प्रकाशन (नाशिक) या दोन महत्त्वाच्या संस्थांकडून हे पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत.

त्यामुळे वाचकांपर्यंत सर्वच क्षेत्रात पोहोचणाऱ्या ‘गोमन्तक’च्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे.

मराठी वृत्तपत्र लेखक संघाच्या 49 व्या राज्यस्तरीय दिवाळी अंक स्पर्धेचा निकाल नुकताच मुंबई येथे घोषित करण्यात आला. यामध्ये संस्थेच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त ‘स्व. विजया मनोहर कोळस्कर स्मृती अमृतप्रेरणा पुरस्कार 2023’ च्या ‘गोमन्तक’ दिवाळी अंकास घोषित करण्यात आला.

Dainik Gomantak
Goa News: ‘ईएसआय’च्या 40 कर्मचाऱ्यांची कंत्राटी तत्त्वावर नेमणूक : मुख्यमंत्री

शिवाय नाशिक येथील ‘दर्पण’कार बाळशास्त्री जांभेकर पत्रकार संघाच्या वतीने दरवर्षी दिवाळी अंक स्पर्धा घेण्यात येते. या स्पर्धेत ‘गोमन्तक’ला तृतीय क्रमांक- उत्कृष्ट दिवाळी अंकाचा पुरस्कार घोषित करण्यात आला आहे.

मराठी वृत्तपत्र लेखक संघाचा पुरस्कार अतिशय महत्त्वाचा मानण्यात येतो. तसेच नाशिक येथील ‘दर्पण’कार बाळशास्त्री जांभेकर यांच्या नावाने कार्यरत असलेल्या पत्रकार संघातर्फे दरवर्षी राज्यस्तरीय दिवाळी अंक स्पर्धा घेण्यात येते.

विविध विषयांना वाहिलेले लेख

2023 सालचा ‘गोमन्तक’ दिवाळी अंक विशेष गाजला. वाचकांच्या तो अधिक पसंतीस पडला, तो त्यातील वेगवेगळ्या विषयांना वाहिलेल्या लेखांमुळे. यातील प्रत्येक लेख नाविन्यपूर्ण असा आहे. त्यामुळे ‘गोमन्तक’चा दिवाळी अंक प्रसिद्ध होताच, अवघ्या काही दिवसांत संपला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com