Diwali 2023 : संस्कृती टिकवणारे कार्यक्रम आवश्यक : आमदार जीत आरोलकर

Diwali 2023 : पार्सेतील खाजन गुंडो बांध येथे ‘दीपोत्सव’ उत्साहात
Diwali 2023
Diwali 2023 Dainik Gomantak

Diwali 2023 : मोरजी, मांद्रे मतदारसंघाचा विकास करत असताना विकासाबरोबरच मनोरंजन आणि संस्कृती परंपरा टिकवणारे कार्यक्रम आवश्यक असतात.

या कार्यक्रमांतून उत्सवांतून हजारो नागरिक एकत्रित येऊन विचारांची देवाणघेवाण करण्याबरोबरच आपली संस्कृती टिकवण्यासाठी जनजागृती करतात. त्यासाठीच मनोरंजनाचे कार्यक्रम आणि संस्कृती टिकवण्याचे उपक्रम राबवणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन मांद्रेचे आमदार जीत आरोलकर यांनी केले.

पार्से खाजन गुंडो बांध परिसरात दीपोत्सवाचे उद्‍घाटन केल्यानंतर ते बोलत होते.‘मांद्रे उदरगत’ व आमदार जीत आरोलकर यांच्या सहकार्यातून प्रथमच पार्सेत दीपोत्सव आयोजित केला होता. या दीपोत्सवामध्ये शेकडो आकाश कंदील, वेगवेगळे खाद्यपदार्थ, रांगोळी स्पर्धा यांचा समावेश होता.शिवाय उपस्थितांनी नदीमध्ये दिवे अर्पण करून मोठ्या प्रमाणात दीपोत्सव साजरा केला.

मोरजी जि. पं. सदस्य सतीश शेटगावकर, कोरगाव जि. पं. सदस्य रंगनाथ कलशावकर, पार्से सरपंच अजय कलंगुटकर , तुये सरपंच सुलक्षा नाईक, आगरवाडा सरपंच राऊत, आयोजन समितीचे अध्यक्ष अजित मोरजकर, पंच सदस्य फटु शेटगावकर, पेडणे नगरसेवक माधव सिनाई देसाई, नगरसेवक मनोज हरमलकर, पंच सुनिता बुगडे देसाई, आमरोज फर्नांडिस ,शरद मांद्रेकर आदी उपस्थित होते.

या दीपोत्सवाच्या निमित्ताने पेडणे तालुका मर्यादित आकाश कंदील स्पर्धा आयोजित केली होती. या आकाश कंदील स्पर्धेमध्ये शेकडो पारंपरिक पद्धतीने आणि इको साहित्य वापरून आकाश कंदील एकापेक्षा एक तयार केले होते. शिवाय खाद्यपदार्थ वेगवेगळी स्टॉल उभारले होते. पोहे बनवण्याची स्पर्धा रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.

आमदार जीत आरोलकर म्हणाले की, विकास करताना जनतेची आपल्याला साथ मिळते, तसेच सरकारकडूनही सहकार्य मिळते. त्याचेच फलित म्हणून दीपोत्सव साजरा होत आहे.. कार्यकर्त्यांनी चार दिवसांत या उत्सवाचे आयोजन केले. एखादा राजा जिंकतो, परंतु त्यामागे जी टीम असते, त्यांना ते श्रेय जाते. या उत्सवाचे पूर्ण श्रेय हे मतदारांना आणि टीमला जाते. उत्सवात काही त्रुटी आहेत, त्या पुढच्या वर्षी दुरुस्त केल्या जातील.

Diwali 2023
Diwali Special : एका दिवसाने काय होते? | Gomantak TV

दीपोत्सवातून संस्कृतीचे दर्शन

दीपोत्सवात लोक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. दिव्यांचा प्रकाश, विद्युत रोषणाईने संपूर्ण परिसर उजळून गेला होता. याबाबत पार्से सरपंच अजय कलंगुटकर यांनी सांगितले की, पार्सेत हा दीपोत्सव आयोजन करून आमदार आरोलकर यांनी येथील लोकांना एक चांगली मेजवानी दिली आहे. मोरजी जिल्हा सदस्य सतीश शेटगावकर यांनी सांगितले की, अशा उत्सवातून आपली संस्कृती किती सर्वश्रेष्ठ आहे हे दिसून येते.

आपण कधी असा विचार केला नव्हता, की या ठिकाणी अशा प्रकारचा भव्य आणि दिव्य उत्सव होईल. ज्याची दूरदृष्टी असते तोच अशा कार्यक्रमाचे यशस्वीपणे आयोजन करत असतो. आमदार जीत आरोलकर यांनी परंपरा, संस्कृती टिकवण्याचे काम करून नव्या कलाकारांना व्यासपीठ दिले आहे.

-रंगनाथ कलशावकर, कोरगाव जिल्हा पंचायत सदस्य

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com