Arambol: हरवळेत वादामुळे दिवजोत्सव, रथोत्सव रद्द

Arambol: भाविक नाराज : प्रशासनाने मंदिर केले बंद; पालखी मिरवणुकीतही गोंधळ
Arambol
ArambolDainik Gomantak

Arambol:

हरवळे येथील श्री रूद्रेश्वर देवस्थानात महाशिवरात्री उत्सवादरम्यान झालेल्या वादामुळे या देवस्थानच्या परंपरेत प्रथमच खंड पडला. वादाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने पहाटे मंदिर बंद केल्याने हरवळेतील देवी केळबाईचा कळस मंदिरात जाऊ शकला नाही. तसेच महाशिवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी (शनिवारी) सकाळी होणारा दिवजोत्सव आणि रथोत्सवही होऊ शकला नाही.

मानपान व हक्काच्या मुद्द्यावरून हरवळेतील श्री रूद्रेश्वर मंदिरात होणाऱ्या महाशिवरात्री उत्सवाला इतिहासात प्रथमच गालबोट लागले. देवस्थान समिती आणि वरचे हरवळे येथील सातेरकर मंडळी यांच्यात मान व हक्क यावरून झालेल्या वादामुळे महाशिवरात्रीदिवशी मंदिरात गोंधळ उडाला. त्यामुळे सकाळीच श्रींचे दर्शन बंद करण्यात आले. परिणामी हजारो भाविकांना ताटकळत उभे राहावे लागले.

वरचे हरवळे येथील सातेरकर गटाच्या गावकऱ्यांनी मानाचा हट्ट लावून धरत मंदिरात ठाण मांडले. अखेर डिचोलीचे उपजिल्हाधिकारी रमेश गावकर यांना हरवळेत पाचारण करण्यात आले. उपजिल्हाधिकारी गावकर यांनी दोन्ही गटांसोबत अनेकदा चर्चा केली; परंतु विषय मिटत नसल्याने गोंधळ सुरूच राहिला. यावेळी मोठ्या प्रमाणात पोलिस फौजफाटा तैनात केला होता.

Arambol
Goa Politics: दक्षिणेतील उमेदवारीचा निर्णय दोन दिवसांत

पोलिसांनीच खेचला रथ

महाशिवरात्री झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी मंदिरात दिवजोत्सव साजरा केला जातो. नंतर श्रींची रथात बसवून मिरवणूक काढली जाते; परंतु मंदिर बंद केल्याने सकाळी दिवजोत्सव होऊ शकला नाही. त्यानंतर रथोत्सवही होऊ शकला नाही. महाशिवरात्रीदिनी सजविलेला रथ अखेर पोलिसांनीच ओढत नेऊन त्याच्या मूळ जागी ठेवला. त्यामुळे या सोहळ्यासाठी आलेल्या भाविकांचा हिरमोड झाला.

कळस मंदिराबाहेरच

देवीचा कळस मंदिरात दाखल झाल्यानंतर गोंधळ निर्माण होण्याच्या भीतीने प्रशासनाने पोलिसांमार्फत देवीचा कळस मंडपाच्या मुख्य गेटवर अडविला. त्यामुळे या ठिकाणी बराच गोंधळ उडाला. पोलिस आणि गावकर मंडळी, समितीचे पदाधिकारी यांच्यात बाचाबाची झाली. त्यानंतर कळस व मोजक्याच गावकरी लोकांना मंडपात सोडले. त्यामुळे देवीचा कळस बाहेरच राहिला.

Arambol
Goa Congress: काँग्रेसचे ख्रिस्‍ती उमेदवारावर एकमत

कळसाची परंपरा खंडित

श्री रूद्रेश्वर मंदिर परिसरात पालखी मिरवणूक झाल्यानंतर केळबाईचा कळस मंदिरात जातो. रात्री या मंदिरात वास्तव्य केल्यानंतर सकाळी कळस रथोत्सव सुरू होण्यापूर्वी मंदिरातून बाहेर काढला जातो व कपड्याचे आवरण घालून पूर्ववत मंदिरात नेला जातो. रथोत्सवाचा सोहळा देवीला दाखविला जात नाही.

हा उत्सव पाहिल्यास देवी माघारी जाण्यास तयार होत नाही, अशी आख्यायिका सांगितली जाते. परंतु कळस रात्री मंदिरात गेलाच नसल्याने तो मंदिरात वास्तव्य करू शकला नाही. मंदिर बंद केल्याने, तसेच कळसाला मंदिरात वास्तव्य करता आले नसल्याने या परंपरेत खंड पडला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com