Colva Beach : ‘आयकॉनिक’ कोलवा समुद्र किनाऱ्याची दुरवस्था; सुधारणा आवश्‍यक

Colva Beach : पर्यटकांना जावे लागते अनेक असुविधांना सामोरे
Colva
Colva Dainik Gomantak

लक्ष्मीकांत गावणेकर

Colva Beach :

फातोर्डा, विश्‍वस्‍तरावर प्रसिद्ध असलेल्या आणि केंद्र सरकारने ‘आयकॉनिक'' म्हणून जाहीर केलेल्या दक्षिण गोव्यातील कोलवा समुद्र किनाऱ्याला हजारोच्या संख्येने पर्यटक भेट देत असतात.

मात्र सध्या या किनाऱ्यांची दुरवस्था झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. या किनाऱ्याची सुधारणा करावी अशी मागणी स्थानिकांनी केली आहे.

किनाऱ्यावर असलेले पथदीप पेटत नाहीत, त्यामुळे येथे दारूड्यांचा संचार वाढलेला आहे. अनेक दारुडे रात्रीच्या वेळी या ठिकाणी येऊन दारू पिऊन दंगा करीत आहेत. तसेच दारू पिऊन खाली झालेल्या बाटल्या किनाऱ्यावर फेकून देऊन कचरा निर्माण करीत आहेत.

Colva
Goa Police: लाच प्रकरणी तीन पोलिस कर्मचाऱ्यांचे तत्काळ निलंबन

तसेच अनेक तरुण मुले-मुली येथील काळोखाचा फायदा घेऊन अश्लील चाळे करत आहेत. अशाने येथे एखाद्यावेळी अघटित होण्याची शक्यता आहे.

या किनाऱ्यावर बालगोपाळांसाठी असलेल्या चिल्ड्रन पार्कमधील उपकरणांची मोडतोडही झालेली आहे. ही उपकरणे मुलांसाठी धोक्याची बनली आहेत.

हा समुद्र किनारा नावापुरती आयकॉनिक राहिलेला आहे. येथील पथदिवे पेटत नाहीत. बालगोपाळांसाठी असलेल्या चिल्ड्रन पार्कची दुरवस्था झालेली आहे. दारूडे व अज्ञात लोकांचा संचार वाढलेला आहे.

पर्यटक नसल्याने धंदा बुडालेला आहे. या किनाऱ्याकडे पर्यटन खात्याचे व संबंधित अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष झालेले आहे. येथे येणारे मंत्री व अधिकारी केवळ हाय, हॅलो करण्यासाठी येत आहेत. अशाने या किनाऱ्याची बिकट अवस्‍था झालेली आहे. या किनाऱ्याची सुधारणा करणे गरजेचे आहे.

- अरुण कारेकर, स्थानिक व्यावसायिक

किनाऱ्यावर असलेले पथदीप पेटत नसल्याविषयी वीज विभागाला सूचित केले आहे. मात्र येथे पेटत नसलेले पथदीप पर्यटन खात्याअंतर्गत येत असल्याचे सांगून या पथदीपांची दुरुस्ती त्यांनी करायला हवी असे विभागाकडून सांगितले जाते.

- सुझी फर्नांडिस, सरपंच कोलवा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com