Dengue News :अनियमित पावसामुळेच होतोय डेंग्यूचा उद्रेक - डॉ. कल्पना महात्मे

आरोग्य विभागाने केलेल्या पूर्वतयारीमुळे यंदा चिकनगुनिया मात्र पूर्णतः नियंत्रणात असून लोटली आणि नावेली येथे केवळ दोन रुग्ण सापडले आहेत
Dengue In Goa
Dengue In GoaDainik Gomantak

Dengue News : पणजी,यंदा जुलैमध्ये पडलेला अतिरिक्त पाऊस आणि त्यानंतरच्या अनियमित पावसामुळेच ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये डेंग्यूचा उद्रेक झाला.

आरोग्य विभागाने केलेल्या पूर्वतयारीमुळे यंदा चिकनगुनिया मात्र पूर्णतः नियंत्रणात असून लोटली आणि नावेली येथे केवळ दोन रुग्ण सापडले आहेत, अशी माहिती आरोग्य विभागाच्या डॉ. कल्पना महात्मे यांनी दिली आहे.

डॉ. महात्मे म्हणाल्या मागील वर्षी २०२२ मध्ये डेंग्यूचे ३०९ रुग्ण मिळाले होते. यंदा जानेवारी ते सप्टेंबरपर्यंत साधारणपणे तितक्याच ३०३ रुग्ण मिळाले. मागील वर्षी वर्षभर डेंग्यू रुग्ण आढळत होते.

यंदा मात्र ते ऑगस्ट आणि सप्टेंबर दरम्यान मिळाले त्यामुळे तो डेंग्यूचा उद्रेक होता, असेही त्या म्हणाल्या. डॉ.महात्मे पुढे म्हणाल्या गेल्या वर्षी मडगाव परिसरात चिकुनगुनियाचे १०० प्रकरणे नोंदवली गेली,

त्यापैकी बहुतांश मडगाव, विशेषत: मोती डोंगर, तसेच नुवेच्या आसपासच्या भागात होते. कुडतरी , काणकोण येथे ही रुग्ण मिळाले होते.

तर यावर्षी संपूर्ण राज्यात या आजाराचे लोटली आणि नावेली येथे केवळ दोन रुग्ण आढळून आले आहेत.

चिकुनगुनियाची प्रकरणे बहुतांश दक्षिण गोव्यात आढळतात, कारण ते उडुपी आणि कारवारमधून बाधित रुग्ण येतात.

त्यामुळे रुग्ण वाढले होते. यंदा आरोग्य विभागाच्या पथकांनी जनजागृतीचे काम केल्याने त्याचा फायदा झाला.

नागरिकांनी अशी घ्यावी काळजी

डॉ. महात्मे म्हणाल्या की, संसर्गजन्य रोगांवर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रशासनाला समुदायाच्या पाठिंब्याची आवश्यकता आहे. नागरिकांनी घरांमध्ये आणि आजूबाजूला पाणी साचणार नाही याची काळजी घ्यावी.

Dengue In Goa
Goa Accident: डिचोलीत दोन दुचाकींचा भीषण अपघात; वीज खात्यातील कर्मचाऱ्याचा मृत्यू....

तापासारखे आजार होताच तातडीने वैद्यकीय सल्ला घेऊन उपचार घ्यावेत.

सप्टेंबरमध्ये ११३ रुग्णांची पुष्टी

सप्टेंबरमध्ये ११३ डेंग्यू रुग्णांची पुष्टी झाली असून यातील सर्वाधिक रुग्ण उत्तर गोव्यातील आहेत तर दक्षिण गोव्यात केवळ रुग्ण सापडले आहेत.

त्याचे मुख्य कारण उत्तर गोव्यात मोठ्या प्रमाणामध्ये बांधकामे सुरू असून पाण्याची अयोग्य पद्धतीने साठवणूक केलेली आहे.शिवाय कामगारही मोठ्या प्रमाणात येत आहेत. म्हणून आम्ही यंदा या कामगारांची तपासणी करत आहोत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com