राज्यात तीन कोरोनाबाधितांचा मृत्यू; नवीन २१५ जणांना लागण

 Death of three corona sufferers in the state  215 new infections
Death of three corona sufferers in the state 215 new infections

पणजी : राज्यात आज आणखी तीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचे मृत्यू झाले. ज्यामुळे राज्यात कोरोनामुळे मृत्यू झालेल्या लोकांची संख्या ५८५ वर आली आहे. मात्र, चांगली बाब ही आहे की, कोरोनाचा रिकव्हरी रेट चांगलाच वाढून ९३.०५ टक्के इतका झाला आहे. दरम्यान, आजच्या दिवशी २१५ जणांना कोरोनाची लागण झाली, तर ३४५ जण कोरोनामुक्त झाले आहेत. राज्यात सध्या कोरोनाचे दोन हजार तीनशे चौऱ्यांशी सक्रिय रुग्ण आहेत. 


आज मृत्यू झालेल्या रुग्णांमध्ये वास्को येथील ६४ वर्षीय महिला, पर्वरी येथील ७३ वर्षीय पुरुष आणि कुडचडे येथील ३९ वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. कुडचडे येथील हा पुरुष हॉस्पिसिओ रुग्णालयात मृतावस्थेतच आणण्यात आल्याची माहिती मिळाली. 
आरोग्य खात्याने दिलेल्या माहितीनुसार, दक्षिण आणि उत्तर गोव्यातील उलपब्ध खाटांची संख्या अद्यापही मोठ्या प्रमाणात शिल्लक आहे.


उत्तर गोव्यात खाटांची संख्या ४६९ इतकी असून सध्या ३७४ खाटा वापरात आहेत, तर दक्षिण गोव्यात ६९२ इतकी खाटांची संख्या असून सध्या ५८५ खाटा वापरात आहेत. आजच्या दिवसभरात एक हजार एकशे पंचाहत्तर लोकांनी होम आयसोलेशनचा पर्याय स्वीकारला, तर ४६ लोकांना इस्पितळात उपचारासाठी भरती करण्यात आले आहे. आज दिवसभरात एक हजार नऊशे एकसष्ट इतके लाळेचे नमुने तपासण्यात आले.


दरम्यान डिचोली आरोग्य केंद्रात ७९, म्हापसा आरोग्य केंद्रात ८४, पणजी आरोग्य केंद्रात १०३, चिंबल आरोग्य केंद्रात ११४, पर्वरी आरोग्य केंद्रात १६९, मडगाव आरोग्य केंद्रात २२८, फोंडा आरोग्य केंद्रात १५५, लोटली आरोग्य केंद्रात ५२, वास्को आरोग्य केंद्रात १२४, कांदोळी आरोग्य केंद्रात १०७  इतके कोरोनाचे रुग्ण उपचार घेत असून राज्यात इतर ठिकाणीही रुग्ण आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com