जोशी कुटुंबियांतर्फे दामोदर सप्ताहाला सुरवात

वास्को दामोदर सप्ताह
वास्को दामोदर सप्ताह

मुरगाव
‘कोरोना’चा संसर्ग वाढू नये याची दक्षता बाळगून त्यानंतर २४ तासांच्या साखळी भजनाला बगल देऊन केवळ दोन गजरांनी भजनाची सांगता करण्यात आली. सामाजिक अंतर ठेवून यंदाच्या सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. सोमवारी दुपारी गोपालकालाने भजनी सप्ताहाची सांगता करण्यात येणार आहे.
‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर सरकारने जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचे काटेकोरपणे पालन करून वास्को सप्ताह उत्सवाला प्रारंभ करण्यात आला. श्री दामोदर मंदिर व्ययवस्थापन समितीचे अध्यक्ष परेश जोशी यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केल्यानुसार यंदाचा सप्ताह सुरू करतेवेळी अवघ्याच भक्तांना मंदिरात प्रवेश देण्यात आला होता. त्यामुळे सोशल डिस्टन्सिंग, तोंडाला मास्क बांधणे हे नियम शिस्तीने बाळगण्यात आले. उत्सव समितीचे सचिव संतोष खोर्जुवेकर, उपाध्यक्ष कृष्णा सोनुर्लेकर, हेमंत फडते, खजिनदार विष्णू गारोडी, शैलेश गोवेकर, विनायक घोंगे आदी प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी उपअधीक्षक राजू राऊत देसाई, पोलिस निरीक्षक परेश नाईक व सुदेश नार्वेकर, उघोगपती नारायण बांदेकर, नितीन बांदेकर यांनी देवासमोर श्रीफळ अर्पण करताना उपस्थिती लावून देवाचे आशिर्वाद घेतले. वास्को परीसरात कोरोनाचा कहर वाढलेला आहे. त्यामुळे यंदा प्रथमच १२२वर्षानंतर वास्को सप्ताह उत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला.

संपादन - यशवंत पाटील

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com