'Curlies' वर आठवडाभर चालणार काम, 30 टक्के जमीनदोस्त!

सीआरझेड विभागाच्या अतिक्रमण पथकाडून तीन दिवसांपासून काम सुरु आहे.
Curlies Club
Curlies ClubDainik Gomantak

हणजूण किनाऱ्यावरील वादग्रस्त कर्लिस रेस्टॉरंटचे बांधकाम मोडण्याचे काम काल रविवारी तिसऱ्या दिवशीही सुरु होते. कर्लिसचे आतापर्यंत 30 टक्के काम जमीनदोस्त करण्यात आल्याची माहिती सरकारी यंत्रणेतील सूत्रांनी दिली.

माहितीनुसार, या बेकायदा कर्लिस रेस्टॉरंटचे बांधकाम पाडण्याचे काम सीआरझेड (Coastal Regulation Zone) विभागाच्या अतिक्रमण पथकाडून तीन दिवसांपासून सुरु आहे. रविवारी सायंकाळी दिवसाअखेर ३० टक्के बांधकाम पाडण्यात आले. हे काम पूर्ण होण्यास आणखी आठवडा लागू शकतो. शिवाय मोडमोड केलेल्या अवशेषांचा ढिगाऱ्यानंतर साफ करण्यास थोडासा विलंब होऊ शकतो, अशी माहिती सूत्रांनी दिली.

Curlies Club
Goa Beach: समुद्राच्‍या पाण्‍यात पुन्‍हा अडकली कार!

सर्व्हे क्र. 42/10 पाडण्यास स्थगिती : येथील सर्व्हे क्र. 42/10 मधील बांधकाम पाडण्याबाबत कर्लिसने सर्वोच्च न्यायालयाकडून स्थगिती मिळविली आहे. त्यामुळे हा भाग वगळून सर्व्हे क्र. 42/11 तसेच सर्व्हे क्र. 42/9 मधील बांधकाम हटविण्याचे काम सुरु आहे.

Curlies Club
National Night Out 2022: गोव्याचे हे समुद्रकिनारे नाईट लाइफसाठी सर्वोत्तम

सदर कर्लिस रेस्टॉरंट वजा क्लब हे हणजूण किनाऱ्यावरील उंच टेकडीवर असल्याने याठिकाणी जेसीबीला थेट जाण्यास आवश्यक मार्ग नसल्याने सध्या मजूर वर्गाकडून हातानेच हे बांधकाम पाडण्याचे काम सुरु आहे. यासाठी हातोडी, कुदळ, गॅस कटर व इतर सामुग्रीचा वापर होत आहे. याशिवाय अधूनमधून कोसळणाऱ्या पावसाच्या व्यत्ययाचा सामना या कामगार वर्गास करावा लागतोय.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com