Kokan Railway : चोरीच्‍या दागिन्‍यांतून कमावले; अन्‌ ‘त्‍यांनी’ जुगारात गमावले

पूर्वीची देणी फेडली : महागडे मोबाईलही घेतले विकत
Konkan Railway
Konkan RailwayDainik Gomantak

Kokan Railway : रेल्‍वेतून प्रवास करणाऱ्या केरळ येथील एका सराफाच्‍या कामगाराचा पाठलाग करून पहाटे तो साखरझोपेत असताना त्‍याच्‍याकडील चार कोटी रुपयांचे सोन्‍याचे दागिने असलेली बॅग लंपास करून नंतर ते सोने मुंबई व बेळगावातील सोनारांना विकणाऱ्या टोळीचे आता कारनामे बाहेर येऊ लागले आहेत.

या चोरीच्‍या पैशांतून त्‍यांनी आपली पूर्वीची सर्व देणी फेडून टाकण्‍याबरोबरच राहिलेले पैसे जुगार व दारूवर खर्च केले. काहींनी त्‍यातून महागडे मोबाईल फोनही खरेदी केले.

२ मे २०२३ रोजी घडलेल्‍या या चोरी प्रकरणात आतापर्यंत कोकण रेल्‍वे पोलिसांनी एका महिलेसह आठ संशयितांना अटक केली आहे.

त्‍यांच्‍याकडून आजपावेतो १.७८ कोटींचे सोने, सात लाख रुपये किंमत असलेल्‍या तीन गाड्या, १.७३ लाखांचे मोबाईल तसेच ४.५५ लाख रुपयांची रोख जप्‍त केली आहे.

या प्रकरणात सर्वांत शेवटी अटक केलेल्‍या अतुल कांबळे, महेंद्र मोरे आणि मोहसीन जमादार या तिघांनी चोरीचे हे सोने सांगलीतून बेळगाव येथे आणून विकल्‍याचे स्‍पष्‍ट झाले आहे. हे सर्व संशयित सध्‍या न्‍यायालयीन कोठडीत असल्‍याची माहिती कोकण रेल्‍वेचे पोलिस निरीक्षक सुनील गुडलर यांनी दिली.

Konkan Railway
Goa Assembly session : काळजावर हात ठेवून सांगा हे खरं की खोटं! - विजय सरदेसाई | CM Pramod Sawant

घटनेची पार्श्वभूमी अशी

केरळमधील एका सराफी दुकानातील कामगार पनवेल-मुंबई येथून सोन्‍याचे दागिने घेऊन ते केरळला नेत असल्‍याची माहिती प्राप्‍त झाल्‍यावर अर्चना मोरे या संशयित महिलेने ही माहिती संदीप भोसले व अक्षय चिनवळ या सांगली येथील दोघांना दिली.

१ मे च्‍या रात्री पनवेलहून सुटलेल्‍या हमसफर एक्‍सप्रेसमधून सदर कर्मचारी प्रवास करत होता. संदीप व अक्षयने त्‍याच रेल्‍वेतून त्‍याचा पाठलाग केला.

आपले सोने असलेल्‍या बॅगला साखळी लावून तो कामगार झोपलेला असताना पहाटे अडीचच्‍या सुमारास त्‍या दोघांनी साखळी कापून बॅग लंपास केली. ही गाडी काणकोण जंक्‍शनवर काही काळासाठी थांबलेली असताना त्‍या दोघांनी गाडीतून खाली उड्या टाकून सोन्‍यासह पोबारा केला.

Konkan Railway
Goa Assembly : स्मार्ट सिटीचे काम 33 % पूर्ण; उरलेले काम ऑक्टोबर पर्यंत पूर्ण करणार - डॉ. सावंत

या दोघांनी नंतर बसमधून खानापूर गाठले. तिथे संतोष शिरतोडे याने आपल्‍या गाडीतून त्‍यांना सांगली येथे नेऊन सोडले. त्‍यानंतर अर्चना मोरे तेथे आली. चोरलेल्‍या दागिन्‍यांपैकी काही दागिने घेऊन ती मुंबईला रवाना झाली.

५ या टोळीतील आणखी एक सदस्‍य धनपत वैद्य याच्‍याकडे सोने दिल्‍यावर त्‍याने ते मुंबईतील बाजारात नेऊन एका कारखान्‍यात वितळवून घेतले आणि ते नंतर काही सोनारांना विकले. दु‍सऱ्या बाजूने अतुल व महेंद्र यांनी त्‍यांच्‍या वाट्याला आलेले सोने बेळगावला आणून विकले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com