salim and anju devani
salim and anju devani

माणसांसह प्राण्‍यांसाठी देवानी जोडपे ठरले देवासारखे....

पणजी, 

‘जे का रंजले गांजले, त्‍यासी म्‍हणे जो आपुले, तोची साधु ओळखावा, देव तेथेची जाणावा...’ हे सत्‍यवचन आहे.

पणजी दयानंद बांदोडकर मार्गावर दुधाचे दुकान असणाऱ्या अंजू देवानी आणि सलीम देवानी या गोमंतकीय जोडप्‍याने टाळेबंदीच्‍या कालावधीत गरजू माणसांना अन्‍न दिले, परंतु शिवाय भुकेने व्‍यतीत असणाऱ्या सुमारे ४० कुत्र्यांना‍या अन्‍-नपाण्‍याचीही सोय केली.

टाळेबंदी शिथिल केल्‍यावरही त्‍यांनी ही मदत सुरूच ठेवून माणुसकीचा धर्म जपला आहे.

पणजीतील दयानंद बांदोडकर मार्गावर देवानी यांचे दुधाचे दुकान आहे. हे दुकान पूर्वी त्‍यांचे वडिल चालवत होते.

टाळेबंदीच्‍या कालावधीत कांपाल मैदानावर अनेक स्‍थलांतरीत गरीब कामगारांनी आसरा घेतला होता. या कामगारांना सुरवातीचे काही दिवस या जोडप्‍याने जेवण पुरविले.

मग त्‍यांच्‍या राहण्‍याची सोय चांगली नसल्‍याने राजधानी पणजीत असणारी आश्रयस्‍थळे त्‍यांच्‍यासाठी शोधली आणि त्‍यांना मदत केली. अनेकजणांना अद्यापही जेवण पुरविण्‍याचे काम करतात.
येता-जाता लोकांना तहान लागत होती. तेव्‍हा लोकांनी पाणी पिता यावे म्‍हणून त्‍यांच्‍या दुकानासमोरील कट्ट्यावर पाणपोईची सोय करण्‍यात आली आहे. तसेच येणाऱ्या जाणाऱ्या कुणाला चहा पिण्‍याची इच्‍छा झाल्‍यास चहाची सोय करण्‍यात आली आहे.

कुत्र्यांसाठी रोज खाद्य
टाळेबंदीच्‍या काळात कुत्र्यांना अन्‍न मिळणेही अवघड झाले होते. आमच्‍या दुकानासमोरील मैदानात सुमारे ४० कुत्रे आहेत. टाळेबंदी असो वा नसो आम्‍ही त्‍यांना रोज खायला देत असल्‍याची माहिती अंजू देवानी यांनी दिली. त्‍यांनी सांगितले, माणूस बोलून आपले दुख मांडू शकतो. मात्र, मुक्‍या प्राण्‍यांचे दुःख आपण समजून घ्‍यायला हवे.

एकमेकांच्या मदतीचा काळ...
ही वेळ एकमेकांना समजून घेऊन मदत करण्‍याची आहे. अनेक लोक हाती पैसे नसल्‍याने उपाशी झोपत आहेत. आपण आपल्‍या आजुबाजूचे वातावरण पाहून एकमेकांच्‍या संकटासाठी उभे रहायला हवे. आज आपण इतरांना मदत केली तर उद्या आपल्‍या मदतीसाठी लोक येतील, हे लक्षात ठेवायला हवे, असा संदेश देवानी जोडप्‍याने दिला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com