कार्निया अंधत्वमुक्ती अभियानाची रविवारपासून सुरुवात कामत

cornea
cornea

पणजी:केंद्र सरकारने निवडलेल्या ‘सक्षम भारत' या संस्थेतर्फे कार्निया अंधत्वमुक्ती अभियान तसेच दिव्यांगत्व सर्वेक्षण गोव्यात २६ जानेवारी ते १० फेब्रुवारीपर्यंत राबविले जाणार असल्याची माहिती ‘सक्षम'चे संतोष कामत यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.याप्रसंगी प्रकाश लोटलीकर आणि प्रदीप शर्मा यांची उपस्थिती होती.
कामत म्हणाले की, या संस्थेच्यावतीने १९१ ग्रामपंचायतींच्या ठिकाणी दोन स्वयंसेवक राहणार आहेत.या स्वयंसेवकाच्या मदतीने प्रत्येक घरात जाऊन लोकांच्या दिव्यांगत्वांची माहिती घेऊन नोंदविली जाणार आहे.ही माहिती पूर्णपणे ॲपवर नोंदविली जाऊन ती माहिती संस्थेकडे आल्यानंतर एकत्रितरीत्या ती संकेतस्थळावर लोकांसाठी उपलब्ध केली जाणार आहे.केंद्र सरकारने २१ प्रकारचे दिव्यांगत्व असल्याचे जाहीर केल्यामुळे सर्व माहिती स्वयंसेवक जमा करणार आहेत.
याशिवाय अंधत्वावर मात करण्यासाठी डोळ्यांच्या समस्या असणाऱ्यांची नोंद करून त्यांच्यावर उपचार करण्याची सोय केली जाणार आहे.राज्यात नेत्रदान करण्याची टक्केवारी फारच कमी आहे. येथील लोक नेत्रदान करू असे म्हणतात, पण प्रत्यक्षात ते करीत नाहीत.राज्यात २०११ च्या जनगणनेनुसार ३० हजार दिव्यांगत्वांची नोंद झाली होती.आता काही प्रमाणात ती संख्या वाढली किंवा कमी झालीही असावी.या नोंदणी उपक्रमास ६०० स्वयंसेवक काम करणार आहेत.दिव्यांगत्वांची नोंद झाल्यानंतर त्या व्यक्तीस यूडीआयडी कार्ड दिले मिळणार आहे.या कार्डचा उपयोग संबंधित दिव्यांग व्यक्तीस देशात कुठेही उपचार घेता येणार आहेत.
दिव्यांग व्यक्तीला अर्जाबरोबर ओळखपत्र म्हणून आधार कार्ड, निवडणूक कार्ड, वाहन परवाना आदी दाखवावे लागेल.त्यानंतर दिव्यांग असल्याचे प्रमाणपत्र, छायाचित्र आणि सह्या असणे आवश्‍यक आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com