Goa Municipal : नगरगाव पंचायत क्षेत्राला जोडणाऱ्या पुलाचे बांधकाम सुरू

सार्वजनिक बांधकाम खात्याच्या वाळपई कार्यालयाच्या वतीने सरकारला प्रस्ताव सादर केला होता
Brahmdev  Devsthan
Brahmdev DevsthanGomantak Digital Team

वाळपई : नगरगाव पंचायत क्षेत्राला जोडणाऱ्या महत्वाच्या अरुंद पुलाच्या बांधकामाला आज नगरगाव सरपंच संध्या खाडीलकर यांच्या हस्ते प्रारंभ करण्यात आला. सदर पूल हा ब्रह्मकरमळी, शेळप, नानेली, शिंगणे या भागात जाणाऱ्यांसाठी उपयुक्त आहे.

गेल्या अनेक वर्षापासून या अरुंद पुलाच्या जागी नव्या पुलाचे बांधकाम करण्यात यावे, अशी मागणी होती. या संदर्भात सार्वजनिक बांधकाम खात्याच्या वाळपई कार्यालयाच्या वतीने सरकारला प्रस्ताव सादर केला होता. आरोग्यमंत्री विश्‍वजित राणे यांच्या प्रयत्नाने या प्रस्तावाला मंजुरी मिळाली.

यावेळी कार्यक्रमात सरपंच संध्या खाडीलकर, उपसरपंच खरवत, पंच मामू खरवत, देवयानी गावकर, राजेंद्र अभ्यंतकर, चंद्रकांत मानकर, उर्मिला गावस, सार्वजनिक बांधकाम खात्याचे अभियंता अरविंद सावईकर, प्रसाद खाडीलकर तसेच देवस्थानचे पुजारी संदिप केळकर व इतरांची उपस्थिती होती.

यावेळी बोलताना संध्या खाडीलकर म्हणाल्या, येथे नवीन पूल व्हावा ही गेल्या कित्येक दिवसांपासूनची मागणी होती. या आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांच्या प्रयत्नामुळे ह्या प्रकल्पाला मंजुरी मिळाली आहे. सदर काम वृंदावन बिल्डर्स यांच्या मार्फत होत असून कामाच्या दर्जावर विशेष लक्ष देण्यात येणार आहे.

Brahmdev  Devsthan
comunidade of Goa : जमीन हस्तांतरणावेळी विश्वासात घेण्याची कोमुनिदादची मागणी

वाहतुकीत तात्पुरता बदल !

लोकांची गैरसोय होऊ नये ,म्हणून तात्पुरती सदर मार्गावरील वाहतूक नगर गाव हेदोडे लईराई मंदिरापासून वाळवंट ब्रह्माकरमळी या मार्गे वळविण्यात येणार आहे.तरी नानेली ,ब्रह्माकरमळी शेळप, शिंगणे या ठिकाणी जाणाऱ्या लोकांनी व ब्रह्मदेव देवस्थान ब्रह्माकरमळी येथे येणाऱ्या पर्यटकांनी नगरगाव लहराई मंदिर ते वाळवंटी या बगल मार्गाचा उपयोग करावा,असे सरपंच संध्या खाडिलकर यांनी सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com