Sheet Huts: सांतिनेज खाडीलगत पत्र्यांच्या झोपड्यांआड पक्की बांधकामे

Sheet Huts: संरक्षक भिंतीला विरोध; सरकारी यंत्रणेने दिला दणका
Sheet Huts
Sheet HutsDainik Gomantak

Sheet Huts: सांतिनेज खाडीला पुनर्जिवित करण्यासाठी दोन्ही बाजूला संरक्षक भिंत उभारण्याचे काम सुरू आहे. स्मार्ट सिटी मिशनअंतर्गत हे काम सुरू असून टोंक-मिरामार येथे अग्निशामक दलाच्या कवायत मैदानाच्या दक्षिणेला असलेल्या खाडीत संरक्षक भिंत उभारली जात आहे.

Sheet Huts
Mopa Airport: मोपा परिसरात तीन हॉटेल्स; महसूल मात्र नगण्यच

या खाडीभोवती असलेली अतिक्रमित घरे कापून त्या ठिकाणी भिंत उभारली जात आहे. तेथील झोपड्या यापूर्वी पत्र्यांच्या दिसत होत्या, परंतु आता अतिक्रमणे हटवताना अर्धा भाग कापल्यानंतर पत्र्याच्या आतील बाजूस चिऱ्याच्या भिंती असून पक्की घरे बांधल्‍याचे आढळून आले आहे.

स्मार्ट सिटी मिशनअंतर्गत सांतिनेज खाडीवर संरक्षक भिंतीचे काम गेल्‍या दोन वर्षांपासून सुरू झाले आहे. परंतु टोंक-मिरामार येथील झोपडपट्टीवाल्‍यांनी संरक्षक भिंत उभारण्यास विरोध केला होता.

अखेर सरकारी खाक्या दाखवल्यानंतर या लोकांनी अतिक्रमण असलेला भाग कापून काढण्यास सहकार्य केले. गेल्‍या दहा दिवसांपासून तेथे संरक्षक भिंत उभारणीसाठी काम सुरू आहे. त्यातील काही झोपडीधारकांनी काम न करून देण्याची धमकी सुपरवायझरला दिली होती. त्यानंतर संबंधित यंत्रणेने आक्रमक पवित्रा घेऊन अतिक्रमित भाग जेसीबीच्या साहाय्‍याने काढला.

बाहेरून पत्रे, आतून पक्के!

खाडीत अतिक्रमण करून, पत्र्यांची शेड उभारून निवास केलेल्या तेथील लोकांनी मतदानकार्ड, रेशनकार्ड व निवासाचा पत्ता मिळाल्‍यानंतर पत्र्याच्या आतून थेट चिऱ्यांचे पक्के बांधकाम केल्याचे आढळून आले आहे. अतिक्रमण हटवण्यास गेलेले सरकारी कर्मचारी या झोपडपट्टीधारकांचे कारनामे पाहून अवाक्‌ झाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com