म्हापसा पोलीस स्थानकात महिलांसाठी तक्रार कक्ष

म्हापसा पोलीस स्थानकातील तक्रार कक्ष पुन:कार्यान्वित
Complaint Room for Women at Mapusa Police Station
Complaint Room for Women at Mapusa Police Station Dainik Gomantak

म्हापसा: म्हापसा पोलीस स्थानकातील (Mapusa Police Station) महिलांसाठी (Women) तक्रार कक्ष अलीकडेच पुन:कार्यान्वित करण्यात आले आहे. या विषयाचा पाठपुरावा म्हापसा पीपल्स युनियनचे पदाधिकारी जवाहरलाल शेटये व सुदेश तिवरेकर यांनी सातत्याने केल्यानंतर आता या कक्षाच्या कार्याला नव्याने चालना मिळाली आहे.

Complaint Room for Women at Mapusa Police Station
Goa: नॅशनल कॅडेट कॉर्प्सच्या स्थापनेच्या 73 वर्धापन दिन साजरा

म्हापसा पोलीस स्टेशनात नागरिकांच्या तक्रारी ऐकण्यासाठी तसेच त्यावर चौकशी करून आरोपींवर कारवाई करणे ही सेवा आहेच. तरीसुद्धा एकंदरीत तक्रारी व प्रलंबित राहिलेल्या प्रकरणांवर वरिष्ठ अधिकारीवर्गाशी भेटून त्यावर प्रत्यक्षात चर्चा करण्यासाठी दर मंगळवार हा खास दिवस असतो. त्यामुळे स्वत:च्या समस्या, तक्रारी व कैफियती मांडणे नागरिकांना शक्य होते. असे असले तरी या विषयाची माहिती सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पुरेशा प्रमाणात पोहचलेली नाही. त्या अनुषंगाने म्हापसा पीपल्स युनियन या संघटनेतर्फे वारंवार समाज माध्यमे व वर्तमानपत्रांच्या साहाय्याने जनजागृती करण्यात आली आहे.

Complaint Room for Women at Mapusa Police Station
मडगावात व्यवसायिक इमारतीमध्ये अग्‍नितांडव

महिला पोलीस अधिकाऱ्याची सोय
महिलावर्गासाठी त्यांच्या समस्या व तक्रारी नोंदवण्याकरता म्हापसा पोलीस स्टेशनवर खास महिलांसाठी तक्रार कक्ष अगोदर होता. तो कक्ष आता वेगळ्या स्वरूपात कार्यरत करण्यात आला आहे. तिथे खास महिला पोलिस अधिकारी उपलब्ध असतात. याचा फायदा महिलावर्गाने स्वत:च्या समस्या मांडण्यासाठी तसेच तक्रार नोंदवण्यासाठी करून घ्यावा, असे आवाहन म्हापसा पीपल्स युनियनतर्फे करण्यात आले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com