Yuri Alemao Slams BJP Government
Yuri Alemao Slams BJP GovernmentDainik Gomantak

भाजप सरकार गोव्याचे शूटिंग डेस्टिनेशनमध्ये रूपांतर करतंय का? आलेमाव यांनी DGP कडे केली मोठी मागणी

गोमंतकीयांना सुरक्षा प्रदान करण्यासाठी पोलीस महासंचालकांनी त्वरित हस्तक्षेप करणे गरजेचे - आलेमाव

गोव्यातील कायदा आणि सुव्यवस्थेबाबत विरोधीपक्षनेते युरी आलेमाव यांनी मुख्यमंत्री प्रमोद सावंत नेतृत्वाखालील सरकारवर टीका केली आहे. भाजप सरकार गोव्याचे शूटिंग डेस्टिनेशनमध्ये रूपांतर करत आहे का? असा सवाल उपस्थित करत त्यांनी गोमंतकीयांना सुरक्षा प्रदान करण्यासाठी पोलिस महासंचालकांनी हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे.

काय म्हणाले विरोधी पक्षनेते?

"मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकार गोव्याचे शूटिंग डेस्टिनेशनमध्ये रूपांतर करत आहे का? मडगाव येथील गोळीबाराच्या घटनेनंतर काही दिवसांतच नेसाय येथे झालेल्या गोळीबाराच्या घटनेवरून राज्यात कायदा व सुव्यवस्था कोलमडल्याचे दिसून येते. गोमंतकीयांना सुरक्षा प्रदान करण्यासाठी पोलीस महासंचालकांनी त्वरित हस्तक्षेप करणे गरजेचे आहे."

Yuri Alemao Slams BJP Government
Dharbandora: क्रूर आणि अमानुष! गावठी बॉम्बच्या स्फोटात साकोर्डा धारबांदोडा येथे रानडुक्कराचे तोंड फुटले

बारा दिवसांत गोळीबाराच्या दोन घटना

मडगाव जुन्या मार्केटमध्ये रसेल डिसोझा (वय 48) याने पैशांच्या वादातून फास्टफूड सेंटरच्या मालकावर गोळ्या झाडल्या. ए-वन खान फास्टफूड सेंटरचे मालक मशीमुल्ला उर्फ लालू खान यातून थोडक्यात बचावले.

संशयित रसेल डिसोझा यांची मागच्या वर्षी झालेल्या कार्निव्हल परेडमध्ये ‘किंग मोमो’ म्हणून निवड झाली होती.

तर, बुधवारी मालमत्ता वादातून नेसायमध्ये गोळीबाराची घटना घडली आहे. गोळ्या झाडल्यानंतर संशयितांनी घटनास्थळावरुन पलायन केले. याप्रकरणी मायणा-कुडतरी पोलिसांनी तिघांविरोधात गुन्हा दाखल केला असून, अधिक तपास सुरु आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com