Sadetod Nayak : शिवराय हिंदूंसाठी आले गोव्यात !

सडेतोड नायक : अभ्यासकांचे मत ; कधीही चर्च, मशिदीची तोडफोड केली नाही
Sadetod Nayak
Sadetod NayakDainik Gomantak

Panaji : छत्रपती शिवाजी महाराज हिंदूंच्या रक्षणासाठी आणि पोर्तुगीज राज्यकर्त्यांच्या अत्याचाराविरुद्ध लढण्यासाठी गोव्यात आले. गोव्यातील ८ तालुके पूर्वी शिवरायांच्या स्वराज्याचा भाग होते. ते कॅथलिकांच्या विरोधात होते, असे कोणतेही कागदपत्र वा पुरावे उपलब्ध नाहीत,असे इतिहास संशोधक सर्वेश सिनाई बोरकर यांनी सांगितले.

संपादक संचालक राजू नायक यांनी ‘सडेतोड नायक’ या विशेष मुलाखतीत, सचिन मदगे आणि सर्वेश सिनाई बोरकर या दोन इतिहास संशोधकांशी गोवा आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या संबंधाविषयी त्यांच्याशी चर्चा केली.

प्रसिद्ध इतिहास अभ्यासक सचिन मदगे यांनी सांगितले की, छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्माच्या १०० वर्षांपूर्वी पोर्तुगीजांनी बार्देश, साष्टी आणि तिसवाडी तालुके जिंकले. धर्माचा प्रसार करण्यासाठी त्यांनी या तीन तालुक्यांतील गोवेकरांवर अत्याचार केले.पुढे १०० वर्षे हा भाग वगळता संपूर्ण गोवा स्वराज्याचा भाग होता.

छत्रपती संभाजी महाराजांच्या निधनानंतर १०० वर्षांनंतर, पोर्तुगीजांच्या नवीन जिंकलेल्या पेडणे, डिचोली, सत्तरी या भागात कोणतेही धर्मांतर किंवा हिंदू मंदिरांची तोडफोड झाली नाही. याला छत्रपती शिवाजी महाराजांचा पोर्तुगीजांवरचा दरारा आणि त्यांच्याशी केलेला करार कारणीभूत आहे.

Sadetod Nayak
Leopard Death News: पुन्हा एकदा फासात अडकून मादी बिबट्याचा अंत, गेल्या 6 महिन्यांत शिकारीच्या प्रकरणांमध्ये वाढ

मदगे पुढे म्हणाले की, जुन्या काळी गोव्यातील आठही तालुके शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्याचा भाग होते. १६६३ पासून पेडणे, डिचोली आणि सत्तरी आणि १६६४ पासून फोंडा, केपे, काणकोण पासून कारवारपर्यंतचा भाग हिंदवी स्वराज्याचा भाग होता. गोव्यातील ८ तालुक्यांमध्ये हिंदू संस्कृती टिकून राहण्याचे मुख्य कारण छत्रपती शिवाजी महाराज होते.

Sadetod Nayak
Goa Petrol-Diesel Price: गोव्यात पेट्रोल-डिझेलच्या दरामध्ये घट; जाणून घ्या आजच्या किंमती

शिवराय आणि गोवाबाबत अभ्यासक म्हणतात !

बार्देशमध्ये लपून बसलेल्या सावंत आणि देसाईंनी जबरदस्तीने उपद्रव केला होता. त्यांना जरब बसवण्यासाठी शिवरायांनी बार्देशात प्रवेश केला.त्यांचा प्रवेश हा राजकीय, सामाजिक कारणासाठी होता. शिवरायांशिवाय कोणीही नव्हता, ज्याने गोव्यात छळ करणाऱ्या पोर्तुगीजांना धडा शिकवला असेल. शिवाजी महाराज हे हिंदूंचे समर्थक आणि संरक्षक होते पण त्यांना इतर धर्मांबद्दल द्वेष नव्हता.

सचिन मदगे, इतिहास अभ्यासक

Sadetod Nayak
Goa Monsoon Update: राज्यभरात सुखावणारी संततधार

शिवाजी महाराजांचे वडील शहाजीराजे भोसले हे आदिल शहांच्या दरबारातील सेनापती होते. शहाजी यांनी १६५४ मध्ये आदिलशहाच्या मार्गदर्शनाखाली साष्टी आणि बार्देशवर हल्ला केला. शिवाजी महाराज गोव्यात आले कारण गव्हर्नरने बार्देशातील हिंदूंना एकतर ख्रिश्चन धर्म स्वीकारा वा बार्देश सोडा,असा फतवा काढला होता. शिवराय कॅथलिकांच्या विरोधात नव्हते. त्यांनी ना चर्च पाडले ना कोणाला त्रास दिला.

सर्वेश सिनाई बोरकर, इतिहास अभ्यासक

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com