Siolim News: ‘शिवरायांनी दहशत संपुष्‍टात आणली’ मुख्याध्यापक सूरज चोडणकर

Siolim News: छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९४ व्या जयंतीनिमित्त शिवोली येथील समर्थन संघटनेतर्फे आयोजित सभेत चोडणकर बोलत होते.
Siolim
SiolimDainik Gomantak

Siolim News:

शिवोली, छत्रपती शिवाजी महाराज हे रयतेचे राजा होते, त्यांच्या छत्रछायेखाली अठरा पगड जातींत विखुरलेले लोक गुण्यागोविंदाने नांदत होते. जनतेच्या मनातील मुघलांची भीती आणि दहशत महाराजांनी संपुष्टात आणली होती.

लोकशाहीप्रधान स्वराज्य महाराजांनी त्यावेळीच जनतेला दाखवले होते,असे वसंत विद्यालयाचे मुख्याध्यापक सूरज चोडणकर यांनी सांगितले.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९४ व्या जयंतीनिमित्त शिवोली येथील समर्थन संघटनेतर्फे आयोजित सभेत चोडणकर बोलत होते.

Siolim
Goa Police : पोलिस प्रशिक्षणार्थींना बढतीची संधी! मुख्यमंत्री

यावेळी हणजुण पोलिस स्थानकाचे निरीक्षक प्रशाल देसाई, हणजूण वाहतूक विभागाचे निरीक्षक सिताकांत नायक, स्वामी समर्थ मठाचे समर्थ मठाचे संस्थापक नीलेश वेर्णेकर,

समर्थन संघटनेचे अध्यक्ष प्रेमानंद आरोलकर, सरपंच अभय शिरोडकर, पंच सिंपल धारगळकर, अमित मोरजकर, शिवरायांच्या अश्वारूढ पुतळा स्थापन समितीचे संदेश हडफडकर तसेच शिवरायांच्या वेशात नितीन आगरवाडेकर उपस्थित होते.

स्वामी मठाकडून भव्य मिरवणुकीचे आयोजन केले. दीपक आगरवाडेकर यांनी स्वागत केले. सूत्रसंचालन संतोष गोवेकर यांनी केले. यदुवीर सिमेपुरुषकर यांनी आभार मानले.

फक्त वेशभूषेने शिवराय होता येत नाही!

हणजूणचे पोलिस निरीक्षक प्रशाल देसाई यांनी सांगितले, की केवळ शिवाजी महाराजांसारखी वेशभूषा परिधान केल्याने कुणी शिवाजी महाराज होत नसतात तर महाराजांची सर्वधर्म समभावाची तसेच महिलांना मातेसमान सन्मान देणारी वृत्ती स्वतःमध्ये जोपासायला हवी.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com