Rice Threshing : भात मळणीवर परिणाम, शेतकऱ्यांची तारांबळ

Rice Threshing : अवकाळी पावसाचा फटका; वाळत घातलेले गवत भिजले
Rice Harvesting
Rice Harvesting Dainik Gomantak

Rice Threshing :

काणकोण, शनिवारी झालेल्या अवकाळी पावसामुळे वायंगण भात पिकाच्या मळणीच्या कामावर पाणी फिरले आहे. अचानक आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांची तारांबळ उडाली.

काणकोणात सध्या वायंगण शेतीच्या मळणीची कामे सुरू आहेत. गेल्या काही दिवसांपासून हवेत उष्मा वाढला होता. त्यामुळे बिगर मौसमी पाऊस पडणार याचा अंदाज होता. शनिवारी सकाळी ९ वाजता सुरू झालेल्या पावसाची रिपरिप दुपारी १.३० वाजेपर्यंत सुरू होती. त्यामुळे मळणी कामे रखडली.

अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. या नुकसानीची पाहणी व्हायला हवी. कृषी खात्याच्या अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घ्यायला हव्यात, अशी मागणी काही शेतकऱ्यांनी केली आहे.

Rice Harvesting
Loksabha Election Goa : काँग्रेसला ‘लीड’ देण्याचे युरींपुढे आव्हान

गवताला गुरे तोंड लावणार नाहीत

गवत कमी पडत असल्याने शेजारच्या कर्नाटक राज्यातून गवत आणले जाते. रविवारी भात शेतीच्या मळणीनंतर अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने गुरांचे वरण भिजले. मळणी करून ठेवलेले गवत पाण्याखाली गेले ते वाळण्यासाठी किमान पाच सहा दिवसांचा कालावधी लागणार आहे. मात्र पावसात भिजलेल्या गवताला गुरे तोंडही लावत नसल्याचे पैंगीण येथील शेतकऱ्यांनी सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com