Bicholim Road : डिचोली ‘आयडीसी’त रस्ता धुळीने माखला; कामगार त्रस्त

Bicholim Road : पावडरीने माखलेला हा रस्ता पावसाळ्यापूर्वी व्यवस्थित केला नाही. तर पावसाळ्यात या रस्त्यावर चिखलाची दलदल निर्माण होण्याची भीती आहे.
Bicholim Road
Bicholim Road Dainik Gomantak

Bicholim Road :

डिचोली, ‘आयडीसी’मधील एका अंतर्गत रस्त्याची दुरवस्था झाली असून, पावडर रस्त्यावर पडल्याने धूळ रस्त्यावर साचली आहे. त्यामुळे कामगारांसह लोकांना प्रदूषणासह अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे.

पावडरीने माखलेला हा रस्ता पावसाळ्यापूर्वी व्यवस्थित केला नाही. तर पावसाळ्यात या रस्त्यावर चिखलाची दलदल निर्माण होण्याची भीती आहे.

गेल्यावर्षी पावसाळ्यात कामगार आणि लोकांना या दलदलीचा वाईट अनुभव आला होता. येथील ईएसआय दवाखान्यासमोरुन पुढे जाणाऱ्या एका स्टील उत्पादन करणाऱ्या प्रकल्पाजवळ तर रस्त्याची अत्यंत वाईट दशा झाली आहे. रस्त्यावर धुळीचे साम्राज्य पसरलेले असून, रस्ता पूर्णपणे पावडरने माखला आहे.

परिसरातील विविध औद्योगिक आस्थापनांनी काम करणारे शेकडो कामगार नियमितपणे या रस्त्यावरून ये-जा करतात. जवळपासच्या वसाहतीतील नागरिकही या रस्त्याचा वापर करतात. मात्र रस्त्यावर माखलेल्या धूळ सदृश्य पावडरमुळे कामगारांसह लोकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. या रस्त्यावरुन एखादे वाहन गेले, की ही धूळ उडून सर्वत्र पसरत असते.

Bicholim Road
Sanquelim Goa: साखळी रस्त्यावर दरड कोसळण्याची भीती; पावसाळ्यापूर्वी उपाययोजना करण्याची मागणी

या धूळ प्रदूषणामुळे आरोग्यावरही परिणाम होण्याची भीती कामगारांना आहे. गेल्या दोन वर्षाहून अधिक काळापासून उद्भवलेल्या या समस्येकडे कोणाचेच लक्ष जात नसल्याबद्धल कामगारांसह नागरिक आश्चर्य व्यक्त करीत आहेत. संबंधीतांनी या समस्येकडे गांभीर्याने लक्ष पुरवून धूळ प्रदूषण नियंत्रणात आणावे, अशी मागणी कामगारांसह महेश मयेकर या नागरिकाने केली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com