Investment Scam : आम्ही फसलो, तुम्ही तरी सावध व्हा..!

नाहीतर कदाचित घामाकष्टाची मिळकत हातातून जाऊन पश्चात्ताप करण्याची वेळ येण्याची भीती आहे.
financial institution Crores lost to customers
financial institution Crores lost to customersDainik Gomantak

तुकाराम सावंत

Investment Scam : डिचोली, वित्तीय संस्था म्हटल्याबरोबर विश्वासार्हता महत्त्वाची. मात्र, गेल्या काही वर्षांतील काही घटना पाहता, काही वित्तीय संस्थांनी ग्राहकांना कोटींचा गंडा घालून गाशा गुंडाळला आहे. डिचोलीतही अनेक ग्राहकांना हा कटू अनुभव आलेला आहे.

वित्तीय संस्थांकडे गुंतवणूक करताना हजारवेळा विचार करा. ग्राहकांनी या संस्थांकडून दाखविण्यात येणाऱ्या अमिषाला बळी पडू नये. नाहीतर कदाचित घामाकष्टाची मिळकत हातातून जाऊन पश्चात्ताप करण्याची वेळ येण्याची भीती आहे.

तेव्हा नागरिकांनी सावध राहावे, असा सल्ला वित्तीय संस्थांच्या अमिषाला बळी पडलेले डिचोली येथील एक हॉटेलमालक एकनाथ लामगावकर आणि कुडचिरे येथील एक व्यावसायिक किशोर गावकर यांनी दिला आहे.

financial institution Crores lost to customers
Goa Tiger Project: व्याघ्र प्रकल्पाबाबत सरकार ‘बॅकफूट’वर

पावसाळ्यात अळंबी उगवावीत, त्याप्रमाणे दहा वर्षांपूर्वी अनेक वित्तीय संस्था उगवल्या होत्या. ठरावीक मुदतीत भरलेल्या रकमेच्या तुलनेत दुप्पट नाहीतर तिपटीने रक्कम देण्याचे आमिष दाखवून या वित्तीय संस्थांनी डिचोलीतील अनेकांचा विश्वास संपादन केला.

काहींनी तर भविष्यातील स्वप्ने रंगविताना काही वित्तीय संस्थांकडे मोठ्या रकमेची गुंतवणूक केली. मात्र, काही दिवसांनी या वित्तीय संस्थांनी गाशा गुंडाळला. त्यामुळे अनेक ग्राहकांना कपाळावर हात मारून घेण्यावाचून अन्य पर्याय राहिलेला नाही.

तो नाद सोडला!

मोठ्या अमिषाला बळी पडून काही वर्षांपूर्वी आम्ही वित्तीय संस्थांकडे गुंतवणूक केली. मात्र, आता कपाळावर हात मारण्याची वेळ आली आहे.

आज ना उद्या पैसे मिळतील. म्हणून वाट पाहिली. मात्र, काहीच फायदा झालेला नाही. आता तर तो नादही सोडून दिला आहे, असे लामगावकर आणि गावकर यांनी सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com